बचत म्हणजे आपलं भविष्य काळ आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि मजबूत करणे हे होय. तुमची छोटीशी गुंतवणुक चांगल्या योजनेत केली तर तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळण्याची हमी असते. जर तुम्ही ही एखादी छोटीशी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या लेखात आपण अशाच एका सरकारी योजनेची माहिती घेऊ.
पोस्ट खात्याची महत्त्वपूर्ण योजना
आपण ज्या योजनेची माहिती घेणार आहोत,योजना सुरक्षित असून चांगला परतावा देणारी आहे तसेच या योजनेचे सगळ्यात आकर्षक आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त 95 रुपयांच्या गुंतवणुकीवर 14 लाख रुपयांचा मोठा निधी मिळणार आहे.
त्यामुळे तुम्हाला भविष्यात आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही व उतारवयामध्ये तुम्हाला भक्कम आर्थिक पाठबळ लागेल.
नक्की वाचा:Post Office: आता पोस्ट ऑफिसमध्ये होणार पीक विम्याची नोंदणी; शेतकऱ्यांना दिलासा
या योजनेचे नाव आहे ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना हे होय. पोस्ट खात्याने ही योजना खास करून जे लोक छोटीशी गुंतवणूक करू इच्छितात अशा लोकांसाठी खास सुरू करण्यात आली आहे. तसेच तुम्ही केलेली गुंतवणुक जोखीम मुक्त आहे.
परिपक्वता कालावधी नंतर मिळतील 14 लाख
या योजनेमध्ये तुम्हाला दर दिवशी 55 रुपये जमा करावे लागतील आणि कालावधी पूर्ण झाल्यानंतर 14 लाख रुपये मिळतात. या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विमाधारकाला त्याच्या जगण्यावर लाभ मिळतो. म्हणजेच मनी बॅक योजनेचा लाभ हि या योजनेत उपलब्ध आहे.
नक्की वाचा:Post Office Scheme: 70 रुपये गुंतवा आणि तब्बल 10 लाख मिळवा, योजना समजून घ्या
मनी बॅकचा अर्थ असा होतो की गुंतवलेले सर्व पैसे तुम्हाला परत मिळतात. तसेच या योजनेमध्ये तुम्हाला परिपक्वते वर बोनस देखील दिला जातो.
या योजनेमध्ये तुम्ही पंधरा आणि वीस वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय कमीत कमी 19 ते 45 वर्षे वयोगटात असणे गरजेचे असून प्रत्येक भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला सुद्धा नियमित पणे गुंतवणूक करावी लागेल आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला 14 लाख रुपये मिळतात.
नक्की वाचा:पीएम किसान लाभार्थ्यांनो सावधान! उद्या शेवटचा दिवस, करा हे काम अन्यथा येणार नाहीत पैसे
Published on: 30 July 2022, 06:52 IST