Awaas Yojana :- समाजातील सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे पक्के घर मिळावे याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना तसेच राज्य सरकारच्या शबरी आवास योजना, रमाई आवास योजना इत्यादी महत्त्वाच्या योजनांचा विचार आपल्याला करता येईल.
तसेच नुकतीच राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आलेली योजना म्हणजे मोदी आवास योजना होय. या योजनेच्या माध्यमातून समाजातील ओबीसी प्रवर्गातील घरांना या योजनेच्या माध्यमातून घरकुले मिळणार आहेत याच बाबतीतली महत्त्वाची अपडेट सोलापूर जिल्ह्यासाठी असून याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
सोलापूर जिल्ह्यातील 35 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 2016 मध्ये जे काही सोलापूर जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले होते त्यामध्ये दिसून आले होते की जिल्ह्यात एक लाख 55 हजार कुटुंबांना हक्काचा निवारा नाही. एकूण बेघर कुटुंबातील 4750 नागरिकांना रमाई घरकुल योजनेतून घरकुल दिले जाणार आहे व शासनाकडून हे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. तसेच आता ओबीसी प्रवर्गातील बेघर असलेल्या कुटुंबांकरिता राज्यात सरकारने मोदी आवास योजनेची घोषणा केली असून त्यांना आता घरकुल मिळणार आहे.
यातील पहिल्या टप्प्यात 30 हजार लाभार्थींना हक्काचे घर मिळेल अशी शक्यता आहे. तसेच तीन वर्षांमध्ये राज्यांमध्ये जे की बेघर कुटुंब आहेत त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन घरकुल बांधून दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असून रोजगार हमी योजनेतून मजुरीकरिता 23 हजार आणि स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शौचालय करिता 12 हजाराचे अनुदान देखील मिळते.
त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर ओबीसी प्रवर्गातील एक लाख लाभार्थी असून त्यांना स्वतःचे घर नाही. अशा बेघर असलेल्या नागरिकांना आता मोदी आवास योजनेतून आणि सोलापूर जिल्ह्यात असलेल्या 50 हजार खुल्या प्रवर्गातील बेघर कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल दिले जाणार आहे.
मात्र अजून पर्यंत पीएम आवास योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झालेले नाही. त्यामुळे आता मोदी आवास योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर आता लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.
बेघर नागरिकांना जागा नसेल तर दिली जाईल जागा
तसेच ज्या नागरिकांकडे घर बांधण्याकरिता जागा नाही त्यांना देखील या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
1- समजा लाभार्थ्यांनी जर स्वतःहून जागा खरेदी केली तर त्याकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेतून 50 हजार रुपयाचे अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे.
2- समजा लाभार्थ्याकडे वडिलोपार्जित जागा आहे व त्यांना संमती पत्राने तर नातेवाईकांच्या नावावरील जागा बक्षिस पत्राने खरेदी करता येते व त्याकरता जी काही स्टॅम्प ड्युटी लागेल ती भरण्याची अट यामध्ये नाही.
3- तसेच ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये अतिक्रमण करून बऱ्याच वर्षापासून राहणाऱ्यांना 500 चौरस फूट जागा नियमित करून दिली जाते व या ठिकाणी घरकुल बांधता येऊ शकते.
4- तसेच हक्काची जागा कोणत्याही ठिकाणी नसलेल्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागेतील एक प्लॉट दिला जातो.
म्हणजे अशा चार पद्धतीने ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना जागा मिळू शकते.
Published on: 27 August 2023, 10:42 IST