Government Schemes

सध्या परिस्थितीत आपण सगळीकडे पाहत आहोत की, तरुणांची एक घालमेल आणि घुसमट फार मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. दरवर्षी निरनिराळ्या प्रकारच्या पदव्या घेऊन तरुण लाखोच्या संख्येने बाहेर पडत आहेत परंतु त्या तुलनेने नोकऱ्यांचे प्रमाण किंवा रोजगार निर्मिती ही फार कमी प्रमाणात होताना दिसत असल्याने खूप मोठ्या संख्येत तरुण बेरोजगार आहेत.

Updated on 24 August, 2022 9:42 AM IST

 सध्या परिस्थितीत आपण सगळीकडे पाहत आहोत की, तरुणांची एक घालमेल आणि घुसमट फार मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. दरवर्षी  निरनिराळ्या प्रकारच्या पदव्या घेऊन तरुण लाखोच्या संख्येने बाहेर पडत आहेत परंतु त्या तुलनेने नोकऱ्यांचे प्रमाण किंवा रोजगार निर्मिती ही फार कमी प्रमाणात होताना दिसत असल्याने खूप मोठ्या संख्येत तरुण बेरोजगार आहेत.

जर आपण नोकऱ्यांचा विचार केला तर खूप दयनीय स्थिती असून अवघ्या शंभर ते दोनशे रिक्त जागांची भरती निघाली तरी पन्नास हजारांपर्यंत अर्ज दाखल होतात.

नक्की वाचा:Fish Rice Farming: शेती उत्पादनाच्या सोबत मिळवा माशांचे उत्पादन,'हा' शेतीप्रकार वाढवेल शेतकऱ्यांचे उत्पन्न

यावरून बेरोजगारीची समस्या किती भयानक स्वरूप धारण करत आहे याचा अंदाज लावता येणे शक्य आहे. दुसरी गोष्ट व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे व्यवसाय करण्यामागील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे भांडवल उभे करणे खूप जिकिरीचे असते.

त्यामुळे बेरोजगार तरुणाची सध्याची स्थिती खूपच वाईट आहे. अशा परिस्थितीत सरकार विविध योजनांच्या माध्यमातून अशा युवकांसाठी विविध उपक्रम राबवून मदत करत असते.

या पार्श्वभूमीवर अशा ग्रामीण भागातील युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम  अंतर्गत खादी व ग्रामोद्योग महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

नक्की वाचा:Important: लघुप्रक्रिया उद्योगात आहे अफाट संधी, तुम्हालाही व्हायचं असेल लघुउद्योजक तर 'अशा'प्रकारे करा कर्जासाठी अर्ज

 तुम्हाला घ्यायचा आहे लाभ तर अशा प्रकारे करा अर्ज

 ग्रामीण भागातील युवक स्वतःच्या पायावर उभे राहावेत व त्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने त्यासाठी https://www.pmegp.online/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवले असून याचा लाभ नक्कीच युवकांनी घ्यावा.

 किती मिळणार कर्ज?

 प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खादी व ग्रामोद्योग महामंडळामार्फत देण्यात येणारे हे कर्ज उत्पादन क्षेत्रासाठी 50 लाख रुपये, सेवा क्षेत्रासाठी वीस लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.

तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून दहा लाख आणि पंचवीस लाखांपर्यंतचे कर्ज या माध्यमातून दिले जाणार आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी तुमच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या  जिल्हा कार्यालय आहे त्या ठिकाणी संपर्क साधावा.

नक्की वाचा:Machinary Subsidy: शेतकरी बंधूंनो!'ही'योजना देते शेतीत यांत्रिकीकरणासाठी अनुदान,वाचा संपूर्ण तपशील

English Summary: this goverment give 50 lakh rupees loan for establish bussiness for unemployment youngster
Published on: 24 August 2022, 09:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)