Government Schemes

सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार असो की राज्य सरकार विविध प्रकारच्या योजना राबवित असतात. जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जीवन जगण्यामध्ये सुकरता यावी तसेच समस्या कमी व्हाव्या हा उद्देश असतो.

Updated on 16 May, 2022 10:54 AM IST

सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार असो की राज्य सरकार विविध प्रकारच्या योजना राबवित असतात. जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला  जीवन जगण्यामध्ये सुकरता यावी तसेच समस्या कमी व्हाव्या हा उद्देश असतो.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आपणाला माहीत आहेच की, विजेची समस्या  मोठ्या प्रमाणावर सद्यपरिस्थितीत भेडसावत आहे. तसेच विजेच्या बाबतीत बर्‍याच प्रकारच्या समस्या निर्माण होतात. कोळसा टंचाई वीजनिर्मिती मधील प्रमुख समस्या आहे. या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा वापर हा खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये ऊर्जेच्या बाबतीत सौर ऊर्जा वापरा  शिवाय पर्याय नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सोलर चा वापर एक चांगला पर्याय ठरू शकतो. लोकांची ही समस्या सुटावी यासाठीसरकारने मोफत सोलर प्लांट बसविण्याची योजना सुरू केली आहे.वाढत्या वीज बिलाच्या समस्येने तुम्ही हैरान  असाल तर सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर मोफत सोलर प्लांट बसवून या समस्यांवर मात मिळवू शकता. सरकारच्या मोफत सोलर प्लांट योजनेमध्ये घरी सोलर बसवण्यासाठी  10 टक्के रक्कम भरावी लागेल आणि उर्वरित 90 टक्के रक्कम सरकार भरते.

 असा बसवा सोलर प्लांट

 केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घराच्या छतावरसोलर प्लांट लावायचा असेल तर तुम्हाला स्वतंत्रपणे अर्ज करावा लागतो.

यासाठी तुम्हाला तुमचे विज बिलआणि वीज खर्च ची संपूर्ण माहिती तुमच्या जवळच्या सोलर प्लांट ची स्थापना करणाऱ्या एजन्सीला द्यावी लागते.  तसेच सोलर प्लांट उभारण्यासाठी तुम्हाला mnre.gov.in अर्ज करावा लागेल.

 घरामध्ये कोणता सोलर प्लांट बसवावा?

 सोलर प्लांट तुमच्या घरी बसवताना तुम्ही अगोदर तुमच्या घरात असलेली कोणती उपकरणे सोलर ने चालणार आहेत,  याचा विचार करावा. उदाहरणार्थ तुम्ही घरामध्ये दीड टन इन्वर्टर एसी लावला असेल आणि त्यासोबत तुम्ही तुमच्या घरात कुलर, पंखा,  बल्ब आणि फ्रिज देखील चालवता. त्यामुळेतुम्ही या योजनांच्या माध्यमातून घराच्या छतावर चार किलो वॅट ची सोलर सिस्टम बसवू शकतात. या सोलर प्लांट मुळे तुमच्या घराला दररोज वीस वॅट पर्यंत वीज मिळेल.

जर तुम्ही तुमच्या प्लांट द्वारे तयार केलेल्या विजेचा पूर्ण वापर करू शकत नसालतर ती वीज कोणत्याही वीज कंपनीला विकून नफा मिळवू शकता.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Royal Enfield: रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बुलेट लाँच करणार; वाचा याविषयी

नक्की वाचा:भारतातील गव्हाच्या सर्वोत्कृष्ट जाती आणि त्यांच्या विशेषता; जाणुन घ्या याविषयी

नक्की वाचा:फ्लॉवरची शेती म्हणजे लाखोंची कमाई; जाणुन घ्या फ्लॉवर शेतीची शास्त्रीय पद्धत

English Summary: this central goverment scheme give more facility to establish solar plant on terrace
Published on: 16 May 2022, 10:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)