Government Schemes

भारताचे कृषी क्षेत्र सतत वाढत आहे. महत्वाचे म्हणजे आता भारतातील सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती यासारखी कृषी तंत्रे परदेशातही लोकप्रिय होत आहेत. यामुळेच केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे.

Updated on 16 June, 2022 12:35 PM IST

भारताचे कृषी क्षेत्र सतत वाढत आहे. महत्वाचे म्हणजे आता भारतातील सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती यासारखी कृषी तंत्रे परदेशातही लोकप्रिय होत आहेत. यामुळेच केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे.

जेणेकरून शेतकरी आणि तरुणांना कृषी स्टार्टअप साठी प्रशिक्षण आणि निधी दोन्ही उपलब्ध करून देता येईल. अशा परिस्थितीत जे लोक आपल्या नोकरीवर खूश नाहीत किंवा ज्यांच्या लवकर यांमधून पुरेसे उत्पन्न मिळत नाही, ते सरकारच्या मदतीने कृषी स्टार्टअप सुरु करू शकतात.

 कृषी स्टार्टअप सोबत कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित

 कृषी क्षेत्रातही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तरुणांना आणि  शेतकऱ्यांना कृषी स्टार्टअप सुरु करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. एग्रीकल्चर स्टार्टअप मुळे केवळ आर्थिक मदतच होणार नाही तर एग्रीकल्चर स्टार्टअप स्वतःला स्मार्ट फार्मिंग ला प्रोत्साहन देत आहे.

नक्की वाचा:सरकारी योजना:'या' योजनेच्या माध्यमातून मिळणार गाई, म्हशी आणि शेळ्या, जाणून घ्या राज्य सरकारच्या या योजनेबद्दल

त्यामुळे शेतीमध्ये डिजिटलायझेशन आणि यांत्रिकीकरण देखील अधिक वेगाने विकसित होत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेती करणे अधिक सोयीचे होईल. मोदी सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रात उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जात आहे.

यासाठी कृषी व्यवसाय अभिमुखता कार्यक्रमांतर्गत शेतकरी व युवकांना 10000 रुपये सलग दोन महिने देण्याची तरतूद आहे.

 कृषी स्टार्ट अप साठी 25 लाख रुपयांचे सुविधा

 आर- एबीआय स्टार्टअप अग्रिबिझनेस इंक्युबॅशन प्रोग्रामच्या बीज टप्पे अंतर्गत, कृषी स्टार्टअप सुरू करण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंतची रक्कम प्रदान केली जाते, ज्यामध्ये 85 टक्के अनुदान आहे आणि अंशतः  अनुदान इन्क्युबेटस द्वारे उपलब्ध 15 टक्के सबसिडी मिळून जाते. Uddam हा एक कृषी उद्योजकता अभिमुखता कार्यक्रम  आहे.

त्याचा उद्देश विद्यार्थी, तरुण आणि स्मार्ट शेतकरी, महिला किंवा कोणत्याही नावीन्यपूर्ण विचारवंतांना संधी प्रदान करणे हा आहे. या अंतर्गत देखील 5 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतचा निधी आर्थिक प्रोत्साहन म्हणून दिला जातो.

या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या कृषी विज्ञान केंद्र व कृषी क्षेत्राशी संबंधित  तर केंद्राकडून लाभार्थ्यांची निवड केली जाते.

अशा परिस्थितीत या शेतकरी बांधवांना किंवा तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोदी सरकारच्या स्टार्ट अप इंडिया योजना ला भेट देऊन अधिकची माहिती मिळवू शकतात.

नक्की वाचा:हे' 6 सीड ड्रील मशीन करतील शेतकऱ्यांचे पेरणीचे काम सोपे, जाणून घ्या त्यांची किंमत आणि वैशिष्ट्ये

नक्की वाचा:लेझर किरणांचा वापर करून 'हे' यंत्र करेल अगदी कमी खर्चात तुमच्या जमिनीचे सपाटीकरण, वाचा सविस्तर माहिती

English Summary: take goverment financial help of 25 lakh and start agri startup
Published on: 16 June 2022, 12:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)