Government Schemes

पाणी हे शेतीसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे या शिवाय शेती होणे शक्य नाही. बऱ्याच ठिकाणी विहिरी द्वारे, बोर द्वारे किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून आपण शेती साठी पाणी घेत असतो. जल सिंचन हे शेतकऱ्यांना शेतासाठी लागणारी महत्वाची गोष्ट आहे. पाण्या वीणा शेती नाही, राज्य शासनाने हीच गोष्ट लक्षात घेऊन शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या साहाय्याने मदतीचा हात दिला आहे.

Updated on 07 October, 2023 4:43 PM IST

पाणी हे शेतीसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे या शिवाय शेती होणे शक्य नाही. बऱ्याच ठिकाणी विहिरी द्वारे, बोर द्वारे किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून आपण शेती साठी पाणी घेत असतो. जल सिंचन हे शेतकऱ्यांना शेतासाठी लागणारी महत्वाची गोष्ट आहे. पाण्या वीणा शेती नाही, राज्य शासनाने हीच गोष्ट लक्षात घेऊन शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या साहाय्याने मदतीचा हात दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेद्वारे या गोष्टींवर अनुदान मिळणार -
या योजनेअंतर्गत विहीर बांधण्यासाठी, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, पंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सिंचन संच (तुषार सिंचन व ठिबक सिंचन) पी व्ही सी पाईप, परसबाग इत्यादी गोष्टीवर अनुदान मिळणार आहे.
या योजनेचा लाभ कोणत्या जिल्ह्यास मिळणार नाही-
सातारा, सांगली, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रत्नागिरी हे जिल्हे वगळता राज्यातील बाकी सर्व जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत अनुदान किती मिळणार -
नवीन विहीर बांधण्यासाठी 2 लाखा 50 हजार रुपये
जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार रुपये
इनवेल बोरिंग साठी 20 हजार रुपये
पंप संच साठी 20 हजार रुपये.
वीज जोडणी साठी 10 हजार रुपये
शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 1 लाख रुपये
ठिबक सिंचन 50 हजार किंवा तुषार सिंचन करिता 25 हजार रुपये.
पी वी सी पाईप साठी 30 हजार रुपये
परसबाग करिता 500 रुपये
या योजनेकरिता पात्रता -
लाभार्थी शेतकरी हा अनुसूचित जाती प्रवरगातिल असणे बंधनकारक आहे.
लाभार्थी जमिनीचा सातबारा 8अ उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 1लाख 50 हजार येवढे असणे बंधनकरक आहे.
लाभार्थी जमीन धारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत असणे गरजेचे आहे. ( नवीन विहीरीसाठी 0.40 हेक्टर किमान)
अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्यास प्राधान्य देण्यात येईल.
अर्जदार अपंग किंवा महिला प्रव्रग्स विशेष प्राधान्य देण्यात येते .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेकरीता आवश्यक कागदपत्रे -
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक खाते पासबुक
जात प्रमाणपत्र SC/ ST
उत्पन्नाचा दाखला
जमिनीच्या ७/१२ व ८-अ चा उतारा

1) नवीन विहिरिकरिता आवश्यक कागदपत्रे -
शेतीचे सातबारा 8अ उतारा
अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
तहसील कार्यालयातील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न ( 1 लाख 50 हजार रूप पर्यंत)
अपंग असल्यास प्रमाणपत्र
लाभार्थीच्या प्रतिज्ञा पत्र 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर
तलाठी यांच्याकडील दाखला
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धचा दाखला
गटविकास अधिकारी यांचे शिफारस पत्र.
ज्या जागेवर विहीर आहे त्या जागेचा विशिष्ठ खूनेसह लाभार्थ्यासहित फोटो
ग्राम सभेचा ठराव
2) जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोरिंग आवश्यक कागदपत्रे -
सूक्ष्म प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
तहसील कार्यालयातील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रूप पर्यंत.
जमीन धारणेचा अद्यावत सातबारा दाखला व 8 अ उतारा.
ग्राम सभेचा ठराव.
तलाठी यांच्याकडील दाखला.
लाभार्थ्यांचे बंधनपत्र 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर
कृषी अधिकारी यांचे क्षेत्र पाहणी व शिफारस पत्र
गटविकास अधिकारी यांचे शिफारस पत्र
ज्या विहिरीवर जुनी विहीर दुरुस्ती किंवा इनवेल बोरिंग चे काम करायचे आहे, त्याविहिरीचा काम सुरू होण्या आधीचा एका खुणेसहित अर्जदाराचा फोटो
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
अपंग असल्यास प्रमाणपत्र.
3) शेततळ्यात अस्तरीकरण / वीज जोडणी अकर / पंप संच / सूक्ष्म सिंचन संच आवश्यक कागटपत्रे -
सक्षम प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपये पर्यंत
जमीन धरणेचा अद्यावत सातबारा दाखला 8 अ उतारा
ग्राम सभेची शिफारस/ मंजुरी
तलाठी यांच्याकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचां दाखला ( 0.20 ते 6 हेक्टर मर्यादित)
काम सुरू कारण्या पूर्वीचा फोटो ( महत्वाच्या खुनेसह )
शेततळे अस्तरीकरण पूर्णत्वाबाबतचे हमी पत्र ( 100/ 500 स्टॅम्प पेपरवर)
या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल तर या अधिकृत संकेतस्थळा https://agriwell.mahaonline.gov.in/ वर जाऊन अर्ज करा.

 

English Summary: Take advantage of Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavlamban Yojana apply for this
Published on: 07 October 2023, 04:40 IST