Government Schemes

भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय करतात. केंद्र व राज्य सरकार कडून देखील शेतकऱ्यांना या जोडधंद्याच्या विकासासाठी आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. जेणेकरून जोडधंद्यांमध्ये शेतकऱ्यांची प्रगती व्हावी आणि पर्यायाने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा हा त्यामागचा उद्देश आहे.

Updated on 15 August, 2022 11:06 AM IST

 भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय करतात. केंद्र व राज्य सरकार कडून देखील  शेतकऱ्यांना या जोडधंद्याच्या विकासासाठी आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. जेणेकरून जोडधंद्यांमध्ये शेतकऱ्यांची प्रगती व्हावी आणि पर्यायाने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा हा त्यामागचा उद्देश आहे.

अशीच कुक्कुटपालनासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी  शासन योजना राबवते, त्यातील महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

नक्की वाचा:Loan Process:गाई-म्हशी खरेदी करायचे असतील अन पशुपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर 'अशा' पद्धतीने मिळते कर्ज

 कुक्कुटपालनासाठी नाविन्यपूर्ण योजना

 कुक्कुटपालन व्यवसायाला गती मिळावी यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून 1000 कुक्कुटपालन मांसल पक्ष्यांचे संगोपन करता यावे यासाठी योजना राबविण्यात येत असून त्या माध्यमातून या वर्षी राज्यातील जवळजवळ दोन हजार 278 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे

व जवळजवळ 33 कोटी पेक्षा जास्त अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी संपूर्ण राज्यातील जिल्ह्यानुसार एक निश्चित उद्दिष्ट ठरवण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 75 टक्के अनुदान मिळणार आहे.

नक्की वाचा:Important:- श्रम कार्ड वरून मिळवा 2 लाखांचे विमा कवच, अशा पद्धतीने करा लवकर अर्ज

 या योजनेच्या बाबतीत शेतकरीसुद्धा उत्साहित असून यासाठी अनुदान मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची मागच्या वर्षी जवळ जवळ संख्या एक लाखच्या आसपास होती. मागच्या वर्षापासून यामध्ये एक बदल करण्यात आला असून जर शेतकर्याने एकदा ऑनलाईन अर्ज केला तर तो अर्ज पुढचे पाच वर्ष ग्राह्य धरला जाणार आहे.

 या योजनेच्या माध्यमातून किती मिळते अनुदान?

या योजनेच्या माध्यमातून 1000 मांसल कुकुट पालन पक्ष्यांच्या संगोपनासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाख 12 हजार 500 रुपये अनुदान दिले जाते.

त्यासोबतच अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना एक लाख 68 हजार 750 रुपये अनुदान दिले जात आहे. यामध्ये लाभार्थ्यांची निवड ही सोडत पद्धतीने केली जाते.

नक्की वाचा:Pm Kisan Update: सरकारने घेतला पीएम किसान योजनेच्या बाबतीत मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मिळेल दिलासा

English Summary: state goverment give subsidy to more than 2 thousand farmer for poultry
Published on: 15 August 2022, 11:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)