Government Schemes

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारचे आजपर्यंतचा सगळ्यात यशस्वी योजनांपैकी एक असून सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची मदत तीन टप्प्यात विभागून देण्यात येते हे आपल्याला माहिती आहे. याव्यतिरिक्त काही महत्त्वाचे फायदे देखील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळतात. याविषयी या लेखात माहिती घेऊ.

Updated on 22 September, 2022 10:31 AM IST

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारचे आजपर्यंतचा सगळ्यात यशस्वी योजनांपैकी एक असून सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची मदत तीन टप्प्यात विभागून देण्यात येते हे आपल्याला माहिती आहे. याव्यतिरिक्त काही महत्त्वाचे फायदे देखील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळतात. याविषयी या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:अरे वा भारीच की राव…! पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार वार्षिक 36 हजार, वाचा सविस्तर

 पीएम किसान लाभार्थ्यांना मिळणारे जास्तीचे फायदे

1- किसान क्रेडिट कार्ड- आपल्याला माहित आहेच कि जेव्हा हंगाम तोंडावर येतो तेव्हा शेतीसाठी खूप प्रमाणात पैशाची आवश्यकता भासते व प्रत्येक वेळी आपला स्वतःजवळ पैसा असतो असे नाही. बऱ्याचदा पैशांच्या अभावी शेतीची कामे वेळेवर पूर्ण होत नसल्याने त्याचा थेट परिणाम उत्पादन घटीवर होतो व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो.

परंतु शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जाते व हे कर्ज अत्यंत सुलभ प्रक्रियेच्या माध्यमातून आपत्कालीन स्थिती व शेतीचे आवश्यक कामे  पूर्ण करण्यासाठी मदत करू शकते.

जे शेतकरी प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी आहेत व त्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नसेल तर असे शेतकरी बँकेशी संपर्क साधून किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकतात.

यामध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीच्या संबंधीची कागदपत्रे व पिकांची संपूर्ण माहिती या अर्जामध्ये नमूद करावी लागते व त्यासोबतच संबंधित लाभार्थ्याला कोणत्याही बँकेकडून किसान क्रेडिट कार्डची सुविधा मिळत नसल्याचे जाहीरनाम्यात नमूद करावे लागते.

नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो 12 व्या हप्त्याची स्थिति घरी बसून एका कॉलवर तपासा; जाणून घ्या

 हे कर्ज तुम्हाला सुलभ रीतीने परतफेड देखील करता येते व यामध्ये तुमचा शेतातील लागवड केलेल्या पिकाच्या कालावधीनुसार आणि पिकाच्या विपणन कालावधीनुसार परतफेडीचा कालावधी निश्चित केला जातो. तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

2-विमाचा देखील मिळतो फायदा- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत प्रीमियम पेमेंटवर प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये पात्र पिकांचा समावेश केला जाऊ शकतो तसेच कर्जदारांना वैयक्तिक अपघात विमा तसेच आरोग्य विमा (ज्या ठिकाणी लागू असेल) त्या ठिकाणी अशा प्रकारचे अनेक पर्याय देखील या योजनेच्या लाभार्थ्यांना उपलब्ध होतात.

नक्की वाचा:Post Office Scheme: पोस्टाच्या 'या'योजनेत गुंतवणूक केल्यास मिळतात 5 वर्षात 1 लाख रुपये, वाचा माहिती

English Summary: so many important benifit get to pm kisan benificiary like as kisan credit card
Published on: 22 September 2022, 10:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)