Government Schemes

माझी कन्या भाग्यश्री योजना (Mazi Kanya Bhagyashree Yojana) ही महाराष्ट्र शासनामार्फत (Maharashtra Government) मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि महिला शिक्षणाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेली योजना आहे.

Updated on 02 June, 2022 7:11 PM IST

माझी कन्या भाग्यश्री योजना (Mazi Kanya Bhagyashree Yojana) ही महाराष्ट्र शासनामार्फत (Maharashtra Government) मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि महिला शिक्षणाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेली योजना आहे. 

या योजनेंतर्गत राज्यातील ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी केली, त्यांना शासनाकडून 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाचा अवलंब केला, तर नसबंदी केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावे सरकारतर्फे 25-25 हजार रुपये बँकेत जमा केले जातील.

योजनेशी संबंधित काही अटी

पहिली अट म्हणजे दोन्ही मुली एकाच व्यक्तीच्या असाव्यात, तरच लाभ मिळू शकेल.

मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी करावी लागेल आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्यांच्या आत नसबंदी करणे अनिवार्य आहे.

योजनेची उद्दिष्टे

या योजनेचा पहिला उद्देश मुलींचे प्रमाण सुधारणे हा आहे.

लिंग-निर्धारण थांबवणे.

राज्यातील स्त्री भ्रूणहत्या थांबवणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.

योजनेचे फायदे

या योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोन मुलींना दिला जाईल.

महाराष्ट्रातील अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये केली आहे.

या योजनेंतर्गत, नॅशनल बँकेत मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने संयुक्त खाते उघडले जाईल आणि दोघांना एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि या अंतर्गत 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळेल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.

जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर त्याला माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 अंतर्गत लाभ मिळू शकतो.

तिसरे अपत्य असल्यास, आधीच जन्मलेल्या दोन्ही मुलींनाही या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.

नियोजनासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराचे आधार कार्ड

आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक

पत्त्याचा पुरावा

उत्पन्न प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. आणि त्यानंतर भाग्यश्री योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

English Summary: Rs 50,000 will be available through Maharashtra Government's 'Ya' scheme, read more
Published on: 02 June 2022, 07:11 IST