Government Schemes

महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात या तीन राज्यांना अद्याप २५०० कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यात महाराष्ट्रातील ३३६ कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत, अशी लेखी उत्तरात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पीक विम्यासंदर्भात माहिती दिली.

Updated on 01 September, 2023 10:16 AM IST

नवी दिल्ली

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतील प्रलंबित दावे याबाबतची माहिती दिली आहे. २०२१-२२ मधील पंतप्रधान पीक विमा योजनेतील २.७६१.१० कोटी रुपयांचे दावे प्रलंबित असल्याचे ते म्हणाले आहेत. राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याला मिळणारे पीक विम्याचे पैसे सर्वाधिक प्रलंबित आहेत.

मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात या तीन राज्यांना अद्याप २५०० कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यात महाराष्ट्रातील ३३६ कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत, अशी लेखी उत्तरात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पीक विम्यासंदर्भात माहिती दिली.

या तीन राज्यांतील काही शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. त्याबाबत तोमर यांना प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्राची भरपाई ३३६ कोटी रुपये आहे. सर्वाधिक थकित भरपाई रक्कम राजस्थानची १३०० कोटी रुपये इतकी आहे.

दरम्यान, तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांचे २०२१-२२ मधील जुलै जून महिन्यातील २७०० कोटीचे दावे प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रकरणात राजस्थानचा पहिला क्रमांक आहे. यासोबत गुजरात आणि महाराष्ट्रातील दावेही मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. 

English Summary: Rs 2,700 crore claims pending in Pradhan Mantri Crop Insurance Yojana See how many rupees of Maharashtra are exhausted
Published on: 08 August 2023, 05:08 IST