Government Schemes

सरकार नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक योजना राबवत आहे. वेगवेगळ्या योजनांची देखील अंमलबजावणी करत आहे. आता नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

Updated on 21 July, 2022 1:28 PM IST

सरकार नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक योजना राबवत आहे. वेगवेगळ्या योजनांची देखील अंमलबजावणी करत आहे. आता नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता सरकारने अन्न वितरण व्यवस्थेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

एटीएम मधून पैसे काढता येतात, मात्र तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल कारण आता एटीएम मधून रेशन गहू तांदूळ काढता येणार आहे. आता रेशन धारकांना गहू तांदूळ सुद्धा एटीएम मधून मिळणार असून त्याची सुरवात ओरिसा सरकार करत आहे. रेशन डेपोवर ही एटीएम बसविली जाणार आहे आणि या एटीएम ला 'ग्रेन एटीएम' नाव देण्यात आले आहे.

रेशन कार्ड धारकाला आपला आधार नंबर आणि रेशनकार्ड (Aadhar Number and Ration Card) वरचा नंबर फीड केला कि एटीएम मधून योग्य धान्य मिळणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग भुवनेश्वर येथे केला जात आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अतनू सब्यसाची यांनी मंगळवारी या योजनेची घोषणा केली आहे व यासंबंधी विधानसभेत माहिती देखील दिली आहे. त्यामुळे लवकरच नगिरकांच्या सेवेत एटीएम मशीन येणार आहे.

माहितीनुसार

माहितीनुसार ही धान्य एटीएम प्रथम शहरी भागात आणि टप्प्याटप्प्याने सर्व ग्रामीण भागात लावली जाणार आहेत. रेशन कार्ड धारकाला त्यासाठी विशेष कोड असलेले कार्ड दिले जाणार आहे. सर्व एटीएम टच स्क्रीन सह (ATM touch screen)आहेत. बायोमेट्रिक सुविधाही मिळणार आहे.

देशातले पहिले ग्रेन एटीएम (First Grain ATM) हरियानाच्या गुरुग्राम मध्ये लावले गेले आहे. विश्व खाद्य कार्यक्रमांतर्गत सरकारने देखील या मशीनला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. या मशिनला ऑटोमेटेड मल्टीकमोडीटी ग्रेन डीस्पेन्सिंग मशीन (Automated Multicommodity Grain Dispensing Machine) असेही म्हटले जाते.

ही धान्य एटीएम प्रथम शहरी भागात आणि टप्प्याटप्प्याने सर्व ग्रामीण भागात लावली जाणार आहेत. रेशन कार्ड धारकाला त्यासाठी विशेष कोड असलेले कार्ड दिले जाणार आहे. सर्व एटीएम टच स्क्रीन सह (ATM touch screen)आहेत. बायोमेट्रिक सुविधाही मिळणार आहे.

देशातले पहिले ग्रेन एटीएम (First Grain ATM) हरियानाच्या गुरुग्राम मध्ये लावले गेले आहे. विश्व खाद्य कार्यक्रमांतर्गत सरकारने देखील या मशीनला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. या मशिनला ऑटोमेटेड मल्टीकमोडीटी ग्रेन डीस्पेन्सिंग मशीन (Automated Multicommodity Grain Dispensing Machine) असेही म्हटले जाते.

English Summary: Ration Machine wheat rice ATM Customers ration machines
Published on: 21 July 2022, 01:28 IST