रेशनकार्डधारकांसाठी (rationcard) एक आनंदाची बातमी आहे. कोविड काळात गरजू लोकांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. आता या योजनेबाबत मोदी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
ही योजना एप्रिल 2020 मध्ये कोविड काळात सुरू करण्यात आली होती. नंतर मार्च 2022 मध्ये ही योजना 6 महिन्यांसाठी सप्टेंबरपर्यंत (september) वाढवण्यात आली. मात्र या पुढे सरकार पुन्हा वाढ करणार की नाही? याविषयी चर्चा रंगल्या होत्या. ही योजना चालूच ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
घरसबसल्या सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला होईल 5 लाख रुपयांची कमाई
या योजनेशी जवळपास 80 कोटी लोक जोडले गेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने (central government) पुन्हा एकदा मोफत रेशन वितरणाची ही सर्वात मोठी योजना सहा महिने म्हणजेच मार्च 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार केंद्रीय अन्न विभागाच्या सचिवांनी तसे संकेत दिले आहेत.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हरभरा, ज्वारी, करडईच्या बियाण्यांवर मिळणार 'इतके' अनुदान
आतापर्यंत 3.40 लाख कोटी रुपयांचा खर्च
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना (food plan) आहे. जी गरिबांसाठी राबविली जात आहे. यासाठी सरकारकडे धान्याचा पुरेसा साठा आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेवर सरकारने आतापर्यंत 3.40 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. अशा स्थितीत या योजनेत वाढ करून शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळणार आहे.
मिळतो इतका लाभ
केंद्र सरकारच्या या गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील सर्व गरीब शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रति व्यक्ती 5 किलो रेशन दिले जाते.
महत्वाच्या बातम्या
कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
सावधान! शेळ्या-मेंढ्यांमध्ये वाढतोय न्यूमोनिया आजार; करा वेळीच उपाय
शेतकऱ्यांना 'या' 12 योजनेतून मिळणार 75 टक्के अनुदान; 83 लाख रुपयांचा निधी जाहीर
Published on: 27 September 2022, 09:58 IST