Government Schemes

केंद्र सरकारकडून समाजातील विविध घटकांना आर्थिक उभारी देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. गरीब, गरजू तसेच महिलांना देखील अशा योजनांचा खूप मोठा फायदा होत असतो.

Updated on 29 April, 2022 2:36 PM IST

 केंद्र सरकारकडून समाजातील विविध घटकांना आर्थिक उभारी देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. गरीब, गरजू तसेच महिलांना देखील अशा योजनांचा खूप मोठा फायदा होत असतो.

 तसे पाहायला गेले तर सरकारचे समाजातील सर्वच घटकांवर बारकाईने लक्ष असून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार कायम प्रयत्नशील आहे. खास करून महिलांच्या बाबतीत विविध योजनांच्या माध्यमातून सरकारचे हेच प्रयत्न  राहिलेली दिसतात. याच पार्श्वभूमीवर सरकारची महिलांसाठी असलेली एक योजना महिलांना एक भक्कम आर्थिक आधार देण्यासाठी उपयुक्त ठरत असून या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्रीमातृत्व वंदना योजना हे होय.या योजनेच्या माध्यमातून महिलांना सहा हजार रुपयांची मदत केली जाते.योजना गर्भवती महिलांसाठी असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त गर्भवती महिला अर्ज करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांना सहा हजार रुपयांची मदत केली जाते.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आई-वडिलांच्या आधार कार्ड, पालकांचे ओळखपत्र, मुलांच्या जन्म प्रमाणपत्र त्यासोबतच बँक खात्याचे पासबुक इत्यादींचा समावेश यामध्ये  येतो. तसेच या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांना 6000 रुपये मिळत असले तरी हे पैसे एकदम सगळे दिले जात नाही. तर तीन टप्प्यांमध्ये विभागून हे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जातात.त्यामध्ये पहिला टप्पा हा एक हजार रुपये, दुसरा टप्पा दोन हजार रुपये तर तिसरा टप्पा दोन हजार रुपये दिले जातात शेवटचा टप्पा बाळाचा जन्म झाल्यानंतर सरकार शेवटच्या हजार रुपये रुग्णालयाला देते.

त्यातून गर्भवती महिलेचा औषधोपचाराचा खर्च भागविला जातो.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:बुरशीजन्य रोगांचा कर्दनकाळ आहे बोर्डो मिश्रण; जाणून घेऊ विविध फळपिके आणि भाजीपाला पिकामधील वापर

नक्की वाचा:कपाशीमध्ये पात्यांची फुलांच्या संख्येत झपाट्याने वाढ करायची असेल तर 'स्टीमुलंट' आहे उपयोगी, जाणून घेऊ सविस्तर माहिती

नक्की वाचा:ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचे! ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य आणि त्यांच्या कमतरतेची लक्षणे

English Summary: pradhanmantri matrutva yojna give financial support to pregnant women
Published on: 29 April 2022, 02:36 IST