Government Schemes

PM Kisan Samman Yojana: शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण PM किसान निधीच्या 12व्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. 12वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे.

Updated on 19 August, 2022 1:39 PM IST

PM Kisan Samman Yojana: शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण PM किसान निधीच्या 12व्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. 12वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे.

विशेष म्हणजे यावेळी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन नव्हे तर चार हजार रुपये जमा होणार आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आणि किती काळासाठी… हे पुढे वाचा…

या तारखेला येणार पीएम किसानचा 12 वा हप्ता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता 1 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 दरम्यान जारी केला जाईल. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 11 हप्ते दिले आहेत. जर सर्व काही सुरळीत झाले तर 1 सप्टेंबरला हा हप्ता जारी होण्याची शक्यता आहे.

या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना वर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल दरम्यान सुरू होतो आणि 31 जुलै रोजी संपतो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान जारी केला जातो. त्याच वेळेनुसार हप्ता जारी झाल्यास, या महिन्याच्या अखेरीस 12 वा पेमेंट केले जाईल.

हे ही वाचा: Petrol Diesel Price: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर! SMS द्वारे जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती...

दोन हप्ते एकत्र येतील, या शेतकऱ्यांना लाभ मिळेल

11 वा हप्ता 31 मे 2022 रोजी दिला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे अनेक लाभार्थी आहेत. ज्यांच्या खात्यात 11व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत. या शेतकऱ्यांना 11 व्या आणि 12 व्या हप्त्याचे पैसे एकाच वेळी देता येतील.

म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे 2-2 हजार रुपये जोडून त्याच्या खात्यात 4 हजार रुपये जमा होतील. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी करून अर्ज स्वीकारले, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.

हे ही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांची होणार दिवाळी! शिंदे सरकारचा मोठा निर्णय, महागाई भत्त्यात वाढ

PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ कसा मिळवावा

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागेल. ही प्रक्रिया योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर होईल.

अर्ज करण्याची सुविधा येथे दिली आहे. यासोबतच ऑफलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हास्तरीय तक्रार निवारण सनियंत्रण समितीशी संपर्क साधावा लागणार आहे.

हे ही वाचा: ई-पीक पाहणीच्या नवीन अ‍ॅपवरुन वेळीच प्रक्रिया करा; अन्यथा होईल मोठे नुकसान

English Summary: Pradhan Mantri Kisan Samman Yojana 12th installment
Published on: 19 August 2022, 01:39 IST