Government Schemes

Post Office Scheme : मित्रांनो आजच्या काळात प्रत्येकजण भविष्याच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी पैसे बचत करतो. मग ते घर असो वा बँक किंवा पोस्ट ऑफिस (Post Office). प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार पैसे वाचवतो, जेणेकरून भविष्यात त्याला जेव्हा गरज असेल तेव्हा तो पैसा वापरता येईल. यामुळेच बँका आणि पोस्ट ऑफिसकडून (Post Office News) वेळोवेळी जनतेसाठी अनेक योजना सुरू केल्या जातात. अशातच काही वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिसकडून (Post Office Yojna) ग्राम सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे.

Updated on 03 September, 2022 7:47 AM IST

Post Office Scheme : मित्रांनो आजच्या काळात प्रत्येकजण भविष्याच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी पैसे बचत करतो. मग ते घर असो वा बँक किंवा पोस्ट ऑफिस (Post Office). प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार पैसे वाचवतो, जेणेकरून भविष्यात त्याला जेव्हा गरज असेल तेव्हा तो पैसा वापरता येईल. यामुळेच बँका आणि पोस्ट ऑफिसकडून (Post Office News) वेळोवेळी जनतेसाठी अनेक योजना सुरू केल्या जातात.

अशातच काही वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिसकडून (Post Office Yojna) ग्राम सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तुमच्याकडे कमी गुंतवणुकीत चांगला आणि सुरक्षित परतावा मिळवण्याची योजना आहे. या योजनेत तुम्हाला दरमहा 50 रुपये गुंतवावे लागतील.

आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की, ग्राम सुरक्षा योजनेत (Gram Suraksha Yojana) कोणताही धोका पत्करावा लागत नाही. कारण की पोस्ट ऑफिस (Post Office Near Me) योजना या सरकारच्या अधीपत्त्या खाली असतात. या योजनेत 50 रुपयांची बचत करून तुम्हाला भविष्यात लाखो रुपये मिळू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. या योजनेत तुम्ही 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार प्रीमियम देखील भरू शकता. प्रीमियम पेमेंटच्या 4 पद्धती आहेत ज्यात मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक (6 महिने) आणि वार्षिक पेमेंट समाविष्ट आहे.

या योजनेत कर्ज सुविधेचा अर्थ असा आहे की तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. यासाठी तुम्हाला या योजनेत किमान 4 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतरच कर्ज घेता येईल.

जर एखाद्या व्यक्तीने 10 लाखांपर्यंतची योजना खरेदी केली तर त्याला 55 वर्षांसाठी 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल. 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांनंतर 34.60 लाख रुपयांचा परिपक्वता लाभ मिळेल.

तथापि, जर तुम्हाला या पोस्ट ऑफिस (Post Office Online) योजनेबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता. आपण याबद्दल ऑनलाइन देखील शोधू शकता.

English Summary: post office scheme gram suraksha yojana
Published on: 03 September 2022, 07:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)