Government Schemes

आपण जेव्हा कष्टाचा पै पै जमा करतो आणि असा कष्टाने जमवलेला पैसा गुंतवणूक करताना खूप विचार करतो. कारण आपली गुंतवणूक सुरक्षित राहणे सगळ्यात अगोदर महत्त्वाचे असून केलेल्या गुंतवणुकीतून परतावा देखील चांगला मिळणे हे देखील महत्त्वाचे असते. आता गुंतवणूक करण्याचा विचार केला तर विविध प्रकारच्या गुंतवणूक योजना आहे. एलआयसी,मॅच्युअल फंड,शेअर मार्केट,विविध बँकांमधील एफडी इत्यादी पर्यायांचा विचार बरेच जण करतात.

Updated on 17 September, 2022 2:38 PM IST

 आपण जेव्हा कष्टाचा पै पै जमा करतो आणि असा कष्टाने जमवलेला पैसा गुंतवणूक करताना खूप विचार करतो.  कारण आपली गुंतवणूक सुरक्षित राहणे सगळ्यात अगोदर महत्त्वाचे असून केलेल्या गुंतवणुकीतून परतावा देखील चांगला मिळणे हे देखील महत्त्वाचे असते. आता गुंतवणूक करण्याचा विचार केला तर विविध प्रकारच्या गुंतवणूक योजना आहे. एलआयसी,मॅच्युअल फंड,शेअर मार्केट,विविध बँकांमधील एफडी इत्यादी पर्यायांचा विचार बरेच जण करतात.

परंतु यांच्यासोबत आपण पोस्ट ऑफिसच्या विविध गुंतवणूक योजनांचा विचार केला तर पोस्टाच्या योजना देखील खूप चांगल्या असून केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याची क्षमता या योजनांमध्ये आहे.

आपल्याला माहित आहेच कि पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या गुंतवणूक योजना असून त्या माध्यमातून गुंतवणूकदारांची रक्कम सुरक्षित तर राहतेच परंतु परतावा देखील चांगला मिळतो. त्यामुळे या लेखात आपण पोस्टाच्या अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेची माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:Important: अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी सरकारची 'ही' विमा योजना आहे खूप फायद्याची, वाचा सविस्तर माहिती

पोस्टाची 'रिकरिंग डिपॉझिट योजना'

 या योजनेत गुंतवणूक करून चांगल्या प्रकारचे रिटर्न्स मिळू शकतात. ही पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना असून यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते. या योजनेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार दोन वर्ष, एक वर्ष किंवा त्याहून जास्त काळासाठी गुंतवणूक करू शकतात.

या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत तुम्ही जी काही रक्कम गुंतवाल तिच्यावर दर तीन महिन्यांनी व्याज जमा केले जाते. दर तीन महिन्यांनी चक्रवाढ व्याजाचा सोबत व्याजाची रक्कम आपल्या खात्यात जमा होते. तुम्ही जवळच्या पोस्टऑफिस मध्ये जाऊन तुम्ही या योजनेत खाते उघडू शकतात. या योजनेत तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केली तर मोठा फंड तुम्ही उभारू शकतात.

अठरा वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती या मध्ये खाते उघडू शकतात. अल्पवयीन मुलांसाठी त्यांचे पालक या मध्ये खाते उघडू शकतात. या योजनेचे आणखीन एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या अंतर्गत तुम्हाला कर्ज देखील घेण्याची सुविधा मिळते.

तुमचे बारा हप्ते जमा झाल्यानंतर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळू शकते.  तुम्ही जेवढी रक्कम खात्यात जमा केलेली असेल त्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम तुम्हाला कर्जरूपाने मिळू शकते.

नक्की वाचा:Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या'योजना देतात बँक एफडीपेक्षा जास्त व्याज, वाचा सविस्तर माहिती

या योजनेत दरमहा दहा हजार गोळा केले तर….

या रिकरिंग डिपॉझिट अर्थात आरडी योजनेत तुम्ही दरमहा दहा हजार रुपये गुंतवले तर दहा वर्षानंतर 16 लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा तुम्हाला मिळू शकतो. प्रति माह दहा हजार याप्रमाणे बारा महिन्यात एक लाख वीस हजार रुपये तुमचे जमा होतात.

यासाठी तुम्हाला दहा वर्षासाठी यामध्ये गुंतवणूक करावी लागेल.दहा वर्षात तुमचे प्रतिवर्ष 1 लाख 20 हजार याप्रमाणे दहा वर्षात बारा लाख रुपये जमा करू शकता व या योजनेच्या मुदतीनंतर तुम्हाला परतावा 4 लाख 26 हजार 476 रुपये मिळुन एकूण 16 लाख 26 हजार 476 रुपये मिळतात.

नक्की वाचा:LIC च्या जीवन प्रगती योजनेमध्ये दररोज 200 रुपये जमा करा आणि मॅच्युरिटीनंतर मिळवा 28 लाख रुपये

English Summary: post office recuring deposit scheme is give more return to investor and profit
Published on: 17 September 2022, 02:38 IST