पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिस (post office) 2022 मध्ये देखील खाते उघडले असेल किंवा तुम्ही एखादी योजना घेण्याचा विचार करत असाल तर आज आपण आशा एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला 35 लाख रुपयांचा फायदा मिळू मिळेल.
पोस्ट ऑफिस योजना (Post Office Scheme) अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात. आज आपण पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला प्रचंड मिळणार आहे.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ही एक प्रकारची विमा योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा केवळ 1500 रुपये गुंतवावे लागतील आणि त्या बदल्यात तुम्हाला 35 लाख मिळतील.
Farmers Subsidy: शेतकऱ्यांना औषधे, तणनाशके आणि कीड नियंत्रणासाठी मिळणार 50 टक्के अनुदान
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये
1) ही पोस्ट ऑफिसची सरकारी विमा योजना आहे.
2) १९ ते ५५ वयोगटातील कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
3) या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 रुपये आहे.
4) जास्तीत जास्त रक्कम 10 लाख रुपये आहे.
5) या योजनेत, तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियमची रक्कम भरू शकता.
6) याशिवाय प्रीमियम भरल्यास 30 दिवसांची सूट मिळेल.
सावधान! शारीरिक कष्ट आणि सावधगिरी बाळगण्याचा आजचा दिवस; वाचा तुमचे राशीभविष्य
कर्जही उपलब्ध
या योजनेत तुम्हाला कर्जाचा लाभही मिळतो. याशिवाय तुम्हाला कर्ज (loan) विम्याची सुविधाही मिळते. पॉलिसी घेतल्यानंतर 4 वर्षांनीच तुम्ही कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकता.
35 लाख कसे मिळणार?
जर तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षापासून या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी (policy) खरेदी केली तर तुम्हाला 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये मासिक प्रीमियम मिळेल.
31.60 लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ 55 वर्षांसाठी उपलब्ध असेल. 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ असेल. तर 34.60 लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ 60 वर्षांसाठी उपलब्ध असेल.
महत्वाच्या बातम्या
कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी करा 'या' तंत्रज्ञानाचा वापर; मिळेल भरघोस उत्पन्न
शेतकऱ्यांना फळबाग, फुलशेतीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान; अंतिम तारीख 'ही' आहे
Honey Farming: मधपालनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान; जाणून घ्या प्रक्रिया
Published on: 27 August 2022, 12:07 IST