Government Schemes

शेती म्हटले म्हणजे एक निसर्गावर अवलंबून असल्यामुळे कायमच अनिश्चितता असलेला व्यवसाय म्हणून ओळखले जाते. शेतीमध्ये कितीही काबाडकष्ट केले तरी बऱ्याचदा हाताशी आलेले पीक निसर्गाच्या चक्रामुळे उध्वस्त होतात व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. निसर्गाचे हे चक्र नित्याचे झाल्यामुळे आता शेतकरी बंधूंना शेतीमधून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

Updated on 17 December, 2022 8:45 PM IST

शेती म्हटले म्हणजे एक निसर्गावर अवलंबून असल्यामुळे कायमच अनिश्चितता असलेला व्यवसाय म्हणून ओळखले जाते. शेतीमध्ये कितीही काबाडकष्ट केले तरी बऱ्याचदा हाताशी आलेले पीक निसर्गाच्या चक्रामुळे उध्वस्त होतात व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. निसर्गाचे हे चक्र नित्याचे झाल्यामुळे आता शेतकरी बंधूंना शेतीमधून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

या सगळ्या कसरती मध्ये  कौटुंबिक जबाबदारी तसेच मुलांचे शिक्षण व लग्न यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी पैसा आणायचा कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. परंतु अशा संकटाच्या काळामध्ये पीएनबी बँक आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे.

 'पीएनबी किसान सुवर्ण' किसान योजना करणार शेतकऱ्यांना मदत

 शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न किंवा घराचे बांधकाम तसेच मुलांचे शिक्षण इत्यादीसाठी पैसा लागत असेल तर शेतकऱ्यांसाठी पीएनबी किसान गोल्ड योजना आणली असून या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना आर्थिक मदत मिळणे आता शक्य होणार आहे.

शेतकऱ्यांचे उत्पादन आणि कृषी आणि इतर क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी बँकेने किसान सुवर्ण योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना ग्रामीण गृहनिर्माण तसेच आयुष्यातील दैनंदिन गरजा,  मुलांचे शिक्षण तसेच विवाह इतर कौटुंबिक कार्य व शिक्षण इत्यादीसाठी लागणारा पैसा उपलब्ध व्हावा या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.

या योजनेसाठी कोणत्या शेतकरी करू शकतात अर्ज

 शेत जमीन असलेले आणि जे शेतकरी कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा लाभ घेत आहेत आणि अर्ज केल्याच्या तारखेनुसार मागील दोन वर्षापासून ज्या शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा एनपीए अर्थात कर्ज थकीत  रेकॉर्ड नाही अशा शेतकऱ्यांना त्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

एकंदरीत शेतकऱ्याचा कमीत कमी दोन वर्ष कालावधीसाठी कुठल्याही बँकेसोबत चांगला व्यवहार आहे असे शेतकऱ्यांना या योजनेत पात्र ठरविण्यात येणार आहे. किंवा जमीन गहाण ठेवली आहे व ती एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या नावावर असेल तर सर्वजण संयुक्तपणे यामध्ये पात्र समजले जातील. यामध्ये शेतकऱ्याचा दोन वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड तपासला जाणार असून मागील दोन वर्षाच्या ठेवी असलेल्या नवीन शेतकऱ्यांच्या बाबतीत ही अट शिथिल केली जाऊ शकते. हे कर्ज 50% लिक्विड कॉलेटरलं सिक्युरिटी आणि 50 टक्के जमीन लेंडरद्वारे सुरक्षित केली जाते.

घर बांधणीसाठी देखील मिळेल कर्ज

घर बांधण्यासाठी कर्ज हवे असेल तर त्यासाठी असलेले नियोजन इत्यादीसाठी सक्षम प्राधिकार्‍याकडून आवश्यक मान्यता घेणे आवश्यक आहे. घर बांधण्यासाठी बँकेच्या ज्या काही गृह कर्ज योजना आहेत त्या अटी पूर्ण करणे गरजेचे असून ग्रामीण घरासाठी अर्ज करायचा असेल तर संबंधितांची कमाल वयोमर्यादा 60 वर्ष असून यामध्ये कायदेशीर नॉमिनी हमीदार म्हणजेच गॅरेंटर असेल तर ही अट 65 वर्षापर्यंत आहे.

या योजनेच्या माध्यमातून कमाल 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणे शक्य आहे. तुम्हाला उत्पादक उद्दिष्टांसाठी कर्ज हवे असेल तर  जी काही कर्ज मर्यादा आहे तिच्या कमीत कमी 75 टक्के रक्कम कर्जाच्या माध्यमातून मिळेल. समजा तुम्हाला अनुत्पादक कारणांसाठी कर्ज हवे असेल तर रकमेच्या पंचवीस टक्के किंवा पाच लाख रुपये यातील जे कमी असेल तितकी रक्कम कर्ज म्हणून मिळते

English Summary: pnb kisan gold scheme do help to financial help for marriege of son,education etc.
Published on: 17 December 2022, 08:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)