Government Schemes

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत सरकार मध्यमवर्गीय आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देत आहे. प्रदुषणमुक्त ग्रामीण भारत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे. जर तुम्ही या योजनेचा अद्याप लाभ घेतला नसेल तर आपण लवकरात लवकर अर्ज करून या योजनेअंतर्गत तुम्ही मोफत गॅस सिलेंडर मिळवू शकता.

Updated on 28 June, 2022 4:30 PM IST

विशेषत: ग्रामीण भागासाठी ही योजना मोदी सरकारने देशात लागू केली होती. ग्रामीण भागातील महिला स्वयंपाकासाठी प्रामुख्याने स्टोव्हचा तसेच लाकूड, शेणाच्या गौऱ्या आणि कोळसा याचा वापर करत असतात.

अशा परिस्थितीत मोदी सरकारने अशा महिलांसाठी मोफत गॅस सिलिंडरचा लाभ देण्यासाठी या योजनेचा अंमल सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना सुरुवातीला 3 मोफत गॅस सिलिंडर दिले जातात, त्यानंतर त्यांना घरगुती सिलिंडरपेक्षा कमी दराने गॅस सिलिंडर दिले जातात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

बीपीएल प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, बीपीएल शिधापत्रिका, कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार फोटो प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, जनधन बँक खाते किंवा नगरपालिका अध्यक्ष किंवा पंचायत प्रधान यांनी जारी केलेले बँक पासबुक यासारखी आवश्यक कागदपत्रे.

मोफत गॅस सिलिंडरसाठी अर्ज कसा करावा:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या एलपीजी केंद्रावर जावे लागेल.

येथे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल.

फॉर्ममध्ये, तुम्हाला तुमची सर्व माहिती द्यावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे देखील द्यावी लागतील.

यासोबतच तुम्हाला किती किलोचा सिलिंडर हवा आहे हे सांगावे लागेल.

निश्चितच मोदी सरकारची ही योजना देशातील ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष फायद्याची सिद्ध होणार आहे. सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत गॅस सिलेंडर दिले जात आहे. यामुळे ही योजना महिला कल्याणासाठी वरदान ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

English Summary: Pm ujjawala scheme free gas cylinder
Published on: 28 June 2022, 04:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)