केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी गुंतवणूक करून लाखो रुपये जमा करू शकता. आता जसे तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्याची म्हणजे शिक्षण, लग्न यांसारख्या खर्चाची चिंता वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. कारण की मोदी सरकारच्या एका योजनेत तुम्ही खूप कमी बचत करून या त्रासातून सुटका मिळवू शकणार आहात.
तुम्ही 250 रुपये सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवून ही योजना सुरू करू शकता आणि तुम्हाला नंतर पूर्ण 15 लाख रुपये मिळतील. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्हाला दररोज फक्त 1 रुपया वाचवावा लागेल आणि नंतर तुम्हाला तब्बल 15 लाख रुपये मिळणार आहेत.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सुकन्या समृद्धी योजनेत इतर योजनांपेक्षा जास्त व्याज मिळते. केंद्र सरकारची ही सुकन्या समृद्धी योजना तुमच्या मुलीचे भविष्य उज्ज्वल करू शकते. या योजनेत तुम्ही किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक जमा करू शकता. या योजनेत गुंतवलेल्या पैशावरही कर सूट आहे.
यामुळे तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणाची आणि भविष्याची काळजी करण्याची गरज नाही. सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेअंतर्गत, मुलगी 10 वर्षांची झाल्यावर, त्यात पैसे जमा करणे सुरू करता येणार आहे आणि ती 21 वर्षांची झाल्यावर तिला परिपक्वतेची रक्कम मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्ही कमी पैसे गुंतवून चांगले पैसे जमा करु शकणार आहात.
तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र सादर करावे लागेल. याशिवाय पालकांचे ओळखपत्र, पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि ते कुठे राहतात याचा पुरावा पासपोर्ट, रेशनकार्ड, वीजबिल, टेलिफोन बिल, पाणी बिल असे द्यावे लागणार आहे.
गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षांपर्यंत असेल:
या योजनेत खाते उघडल्यापासून 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. जर तुम्हाला दोन मुली असतील तर तुम्ही दोन्ही मुलींसाठी खाते उघडू शकता. समजा तुम्ही वयाच्या 9 व्या वर्षी तुमच्या मुलीचे खाते उघडले असेल तर तुम्हाला 12 वर्षे पैसे जमा करावे लागतील.
तुम्हाला असे लाखो रुपये मिळतील:
सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. जर तुम्ही या योजनेत दरमहा 3000 रुपये गुंतवले तर ते वार्षिक 36000 रुपये होईल. त्यानुसार 14 वर्षात 7.6 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने 9,11,574 रुपये उपलब्ध होतील. 21 वर्षांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीनंतर तुम्हाला सुमारे 15,22,221 रुपये मिळतील.
Published on: 15 July 2022, 11:14 IST