Government Schemes

बाजारामध्ये अनेक प्रकारच्या आकर्षक गुंतवणूक योजना असून या माध्यमातून आकर्षक परतावे देखील ग्राहकांना दिले जातात. कारण बऱ्याच अंशी लोकांचा कल हा तरुणपणात कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवून कमीत कमी मुला बाळांचे शिक्षण हे व तसेच इतर दैनंदिन आयुष्य आरामात जगता यावे आणि स्वतःच्या वृद्धापकाळमध्ये काही पैशांची मदत व्हावी या उद्देशाने गुंतवणूक करतात.

Updated on 08 November, 2022 9:08 PM IST

 बाजारामध्ये अनेक प्रकारच्या आकर्षक गुंतवणूक योजना असून या माध्यमातून आकर्षक परतावे देखील ग्राहकांना दिले जातात. कारण बऱ्याच अंशी लोकांचा कल हा तरुणपणात कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवून कमीत कमी मुला बाळांचे शिक्षण हे व तसेच इतर दैनंदिन आयुष्य आरामात जगता यावे आणि स्वतःच्या वृद्धापकाळमध्ये काही पैशांची मदत व्हावी या उद्देशाने गुंतवणूक करतात.

गुंतवणूक करताना गुंतवणूक करणे तर महत्वाच्या आहेच परंतु आपली गुंतवणूक किती सुरक्षित आहे हे देखील पाहणे तितकेच गरजेचे असते. परंतु जर आपण समाजातील असे काही घटक आहेत की ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात.

अशी बरीच कुटुंब आहेत की त्यांना वर्तमानाची पडलेली असते तर भविष्यकाळासाठी गुंतवणूक करणे त्यांच्यासाठी खूप दुरापास्त अशी बाब होऊन जाते. त्यामुळे सरकारने अशा क्षेत्रातील घटकांसाठी देखील एक महत्त्वाची गुंतवणूक योजना आणली असून तिच्या माध्यमातून अशा संघटित क्षेत्रातील लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करता येतो.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहिरीसाठी वाढीव अनुदान

केंद्र सरकारची पीएम श्रम योगी मानधन योजना

 केंद्र सरकारची ही एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील व्यक्ती जसे की रिक्षा चालक, बांधकाम कामगार तसेच रस्त्यावरील विक्रेते इत्यादी लोकांचा यामध्ये समावेश होतो. पीएम श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून सरकारद्वारे अशा व्यक्तींना किंवा कामगारांना पेन्शनची हमी देण्यात येते.

यामध्ये दररोज दोन रुपये जमा करून वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळणे शक्य आहे. जर आपण या योजनेचे सगळे स्वरूप समजून घेतले तर लक्षात येते की, ही योजना सुरू केल्यानंतर प्रत्येक महिन्याला 55 रुपये जमा केले तर  म्हणजे दररोज दोन रुपयापेक्षा कमी पैसे यामध्ये जमा करणे गरजेचे असून या योजनेत वयाच्या 18 व्या वर्षी दररोज जवळपास दोन रुपये जमा केल्यास वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळणे शक्य आहे.

समजा एखाद्या व्यक्तीने त्याच्या वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला प्रत्येक महिना दोनशे रुपये जमा करणे गरजेचे असून साठ वर्षानंतर त्याला पेन्शन मिळू लागेल व महिन्याला तीन म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन मिळेल.

नक्की वाचा:PM Kisan: पाव्हणं! 13व्या हप्त्याचा लाभ घ्यायचाय ना; तयार करा 'ही' कागदपत्रे, नाहीतर खात्यात पैसे येणार नाही

अशा पद्धतीने करा रजिस्ट्रेशन

 तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये कामगार पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करू शकतात. यासाठी या योजनेचे एक वेब पोर्टल असून या माध्यमातून ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँकेचे बचत खाते पासबुक आणि आधार कार्ड असणे आवश्यक असून 18 वर्षे कमी आणि 40 वर्ष पेक्षा जास्त वय नसावे.

नक्की वाचा:'शेती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकार कृषी स्टार्टअप्सना मदत करत आहे'

English Summary: pm shramyogi maandhan yojna so benificial pension for lebour
Published on: 08 November 2022, 09:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)