Government Schemes

भारतामध्ये शेती सोबत शेतकरी बऱ्याच प्रकारचे जोड धंदे करतात. यामध्ये पशुपालन, कुक्कुटपालन, वराह पालन, शेळीपालन तसेच मत्स्य पालन इत्यादी व्यवसायांचा यामध्ये समावेश करता येईल.

Updated on 21 April, 2022 11:24 AM IST

भारतामध्ये शेती सोबत शेतकरी बऱ्याच प्रकारचे जोड धंदे करतात. यामध्ये पशुपालन, कुक्कुटपालन, वराह पालन, शेळीपालन  तसेच मत्स्य पालन इत्यादी व्यवसायांचा  यामध्ये समावेश करता येईल.

या सगळ्या प्रकारच्या व्यवसायांना शासनातर्फे मातीच्या प्रकारचे योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. भरघोस स्वरूपात अनुदान देऊन शेतकऱ्यांना या योजनांच्या माध्यमातून या एक आर्थिक मदतीचा हात दिला जातो. जेणेकरून शेतकऱ्यांना करत असलेल्या व्यवसायामध्ये  आर्थिक अडचणीमुळे कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये व त्यांची या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती व्हावी हा त्यामागचा हेतू आहे. आता आपल्याला माहित आहेच की बरेच शेतकरी  मत्स्य पालन व्यवसाय करतात. शेतांमध्ये असलेल्या शेततळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मत्स्यशेती बरेच शेतकरी करीत आहेत.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी योजना! मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे ही योजना

 अशा शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजना खूपच प्रभावीपणे फायदेशीर ठरत आहे. या योजनेच्या अंतर्गत जर मत्स्य व्यवसाय सुरू करायचा असेल तर अनुदान देखील मिळते. आतापर्यंतचा मत्स्यपालन व्यवसायातील जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा  विचार केला तर अशा योजनांमध्ये या योजनेचा नंबर लागतो.

 या योजनेच्या माध्यमातून मत्स्य पालकांना मत्स्य पालनासाठी कर्ज तर उपलब्ध केले जाते परंतु त्या सोबत  अगदी निशुल्क प्रशिक्षण देखील दिले जाते.

 या योजनेच्या माध्यमातून मिळते 60 टक्के अनुदान

 जर या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व महिलांना मत्स्य पालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशा लाभार्थ्यांना 60 टक्के अनुदान दिले जाते तसेच इतर लाभार्थ्यांना 40 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान प्रदान केले जाते. आता आपल्याला माहित आहेच की, कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरकाही अटी आणि पात्रता पूर्ण करणे आवश्यक असते. तशाच पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. यातील महत्त्वाचे म्हणजे जो अर्जदार असेल तो भारताचा कायम रहिवाशी असणे आवश्यक आहे. हे प्रमुख आहे. अशाप्रकारचे मत्स्य उत्पादक शेतकरी भारताचे रहिवासी आहेत ते या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मत्स्य सम्पदा योजनेच्या माध्यमातून फिश फार्मर क्रेडिट कार्ड द्वारे कुठल्याही गॅरंटी शिवाय एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळते. या कार्डच्या माध्यमातून कमाल तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज तुम्ही देऊ शकतात.जे कोणी तरुण शेतकरी बंधूंना या व्यवसायामध्ये यायचे असेल त्यांनी या योजनेच्या माध्यमातून अर्ज करून आवश्यक लाभ मिळवावा. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या मत्स्य विभागाशी अथवा कृषी विभागाशी संपर्क साधूनअधिकची माहिती घेऊ शकता.

English Summary: pm matsysampada scheme give more economic support to farmer
Published on: 21 April 2022, 11:24 IST