Government Schemes

केंद्र आणि राज्य सरकार समाजातील सगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अमलात आणत असतात. कारण या योजना आणण्यामागे केंद्र सरकारचा उद्देश आहे की, सर्व घटकांना सगळ्या सोयीसवलती मिळून त्यांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे हा आहे.

Updated on 27 July, 2022 3:18 PM IST

 केंद्र आणि राज्य सरकार समाजातील सगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अमलात आणत असतात. कारण या योजना आणण्यामागे केंद्र सरकारचा उद्देश आहे की, सर्व घटकांना सगळ्या सोयीसवलती मिळून त्यांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे हा आहे.

त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी देखील एक नवनवीन योजना आणत असून याचाच एक भाग म्हणून मुलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात सन 2017 या वर्षी करण्यात आली.

या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात सर पैसे ट्रान्सफर केले जातात. यामागे सरकारचा उद्देश आहे की महिलांनी स्वावलंबी व्हावे व ज्यांच्याकडे रोजगाराचे साधन नाही त्यांना मदत व्हावी हा उद्देश आहे.

नक्की वाचा:LPG Subsidy: एलपीजी सबसिडीबाबत सरकारची जबरदस्त योजना; जाणून घ्या कोणाला मिळणार सबसिडी

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना

या योजनेच्या माध्यमातून आई आपल्या बाळाची काळजी घेऊ शकते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार तीन हप्त्यांमध्ये पैसे महिलांच्या खात्यात ट्रान्सफर करते.या योजनेत गर्भवती महिला अर्ज करु शकतात.

गरोदर महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांकडे आधार कार्ड,पालकांचे ओळखपत्र, मुलाचा जन्म दाखला, बँक खाते पासबुक असणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत गरोदर असलेल्या आणि पहिल्यांदा स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना एक जानेवारी 2017 रोजी सुरू करण्यात आली. योजना प्रधानमंत्री गर्भधारणा सहाय्य योजना म्हणून देखील ओळखली जाते.

नक्की वाचा:Eknath Shinde: चक्क एकनाथ शिंदेंनीच केला मोदींचा निर्णय रद्द; आवास योजनेला दिली स्थगिती

तीन हप्त्यांमध्ये मिळतात पैसे

 या योजनेचा उद्देश्य आई आणि मूल दोघांचीही चांगली काळजी घेणे हा असून सरकार या योजनेच्या माध्यमातून तीन टप्प्यात आर्थिक मदत करते.

यामध्ये पहिला टप्पा एक हजार रुपयाचा,दुसरा टप्पा दोन हजार रुपयाचा आणि तिसर्‍या टप्प्यात दोन हजार रुपये गर्भवती महिलांना दिले जातात. सोबतच बाळाच्या जन्माच्या वेळी सरकार शेवटचे एक हजार रुपये रुग्णालयाला देते.

नक्की वाचा:अरे व्वा! मोदी सरकारच्या या योजनेतून मिळतायेत दरमहा ५००० हजार, तुम्हीही असा घ्या लाभ...

English Summary: pm matrutva vandana yojna give 6 thousand rupees to pregnant women
Published on: 27 July 2022, 03:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)