शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकार नवनवीन योजना राबवत असते. यामधील शेतकऱ्यांची सर्वात जास्त पसंतीची योजना म्हणजे प्रधानमंत्री कुसुम योजना (Pradhan Mantri Kusum Yojana). सरकार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना (farmers) अनुदान देते.
सौर पंप (Solar pump) लावण्यासाठी शेतकऱ्यांना सरकार अनुदान मिळतं. देशातील वाढतं प्रदुर्षण आणि जागतिक तापमानवाढीचा धोका पाहाता सरकारने सौर ऊर्जा (Solar energy) क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. तसेच शेतकऱ्यांना जोडत कमाईचं साधन देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
सरकार इतकं अनुदान देते
पीएम कुसुम योजनेअंतर्गंत (PM Kusum Yojana 2022) सरकारकडून जवळपास 60 टक्के अनुदान दिले जाते. तर 30 टक्के लोन बँककडून मिळते. तर दहा टक्के शेतकऱ्यांना लावावे लागतात. त्यानंतर मोफत विजेचा लाभ घेता येऊ शकतो.
कुसुम योजनेचा शेतकर्यांना (farmers) मोठा फायदा होतो, कारण शेतकऱ्यांना विजेचासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. याचाच फायदा शेतीमध्ये दिसून येतो.
हे ही वाचा
Future Numerology: या व्यक्तींच्या आयुष्यात येणार वळण; अंकशास्त्रानुसार पहा तुमचं भविष्य
कमाई अशी करा
जर एखाद्या शेतकऱ्यांकडे पाच ते सहा एकर जमीन असेल तर तो सोलार प्लांट (Solar plant) करत कमीत कमी 15 ते 20 लाख युनिट (Electricity Unit) वीज निर्मिती करु शकतो. ही वीज तीन रुपये प्रति युनिटने विकली तरी जवळपास 60 लाख रुपयांची कमाई होऊ शकते.
पण इतके मोठं सोलार प्लांट (Solar plant) सुरु करण्यासाठी जवळपास 20 लाख रुपयांचा खर्च होतो. पण या योजनेमार्फत तुम्ही वर्षाला 40 लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकता. त्याशिवाय शेतात तुमचा कायमस्वरुपी विजेचा प्रश्न सुटू शकतो.
हे ही वाचा
irrigation: सरकारची भन्नाट ऑफर; शेतातील सिंचनासाठी विजेची गरज पडणार नाही
अर्ज असा करा
पीएम कुसुम योजनेसाठी (PM Kusum Yojana 2022) अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://mnre.gov.in/ या सरकारी संकेतस्थाळावर जावे लागेल. यामध्ये प्रॉपर्टी, आधार कार्ड आणि बँक डिटेल्सची माहिती भरावी लागेल. महत्वाचं म्हणजे, तुमची जमीन वीज उपकेंद्रांच्या पाच किलोमीटरच्या आतमध्ये हवी. तेव्हाच तुम्हाला पीएम कुसुम योजनेचा लाभ घेता येईल.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांचे सोन्याचे दिवस; पीक नष्ट झालं तरी मिळणार सुरक्षा, सरकार देतंय एवढी रक्कम
दिलासादायक बातमी! पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांचे वाटप
क्या बात है! अपंग पेन्शन योजनेचे ऑनलाइन अर्ज सुरू; इतकी मिळतेय पेन्शन
Published on: 24 July 2022, 10:25 IST