Government Schemes

PM Kisan Tractor Yojana: देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. तसेच शेतीला चालना मिळण्यासाठी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. तसेच आता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत निम्म्या किमतींमध्ये ट्रॅक्टर दिले जात आहेत.

Updated on 11 October, 2022 4:57 PM IST

PM Kisan Tractor Yojana: देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार (Central Govt) अनेक योजना राबवत आहे. तसेच शेतीला चालना मिळण्यासाठी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरु केली आहे. तसेच आता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत निम्म्या किमतींमध्ये ट्रॅक्टर दिले जात आहेत.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी दुहेरी खुशखबर आहे. दिवाळीपूर्वी देशातील 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा 12वा हप्ता येणार आहे. त्याचबरोबर या दिवाळीत शेतकऱ्यांचे स्वत:च्या ट्रॅक्टरचे स्वप्नही साकार होऊ शकते.

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत शेतकरी जवळपास अर्ध्या किमतीत नवीन ट्रॅक्टर (new tractor at half price) खरेदी करू शकतात. वास्तविक, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना सातत्याने राबवत आहेत.

याअंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50 टक्के अनुदान दिले जात आहे. तुम्हाला सांगतो की पीएम किसान ट्रॅक्टर सबसिडी योजनेंतर्गत दिलेली अनुदानाची रक्कम ट्रॅक्टरच्या किमतीवर दिली जाते, तर ट्रॅक्टर खरेदीवरील जीएसटी आणि इतर खर्च शेतकऱ्याला करावा लागतो.

महाराष्ट्रासह आज 23 राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; यलो अलर्ट जारी

या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांकडून अर्ज मागवतात. शेतकऱ्यांना हवे असल्यास केंद्र किंवा राज्य सरकारच्या मदतीने ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेऊन ते अर्ध्या किमतीत खरेदी करू शकतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि लहान शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

किसान ट्रॅक्टर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराने आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक, बँक खाते-तपशील-पासबुकची प्रत, शेतातील खसरा खतौनीची प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.

मुलायम सिंह यादव यांची संपत्ती किती कोटींची होती? मुलगा अखिलेशकडूनही घेतले होते कर्ज

किसान ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करावा

पात्र शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत त्यांच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. यासोबतच या योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी इच्छुक शेतकरी त्यांच्या जिल्ह्यातील जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशीही संपर्क साधू शकतात.

किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता

1.शेतकऱ्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.
2.बँक खाते हे आधार आणि पॅन लिंक केलेले खाते असावे.
3.शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
4.आधीच ट्रॅक्टर नसावा.
5.एका शेतकऱ्याला फक्त एक ट्रॅक्टर खरेदी केल्यास अनुदान मिळेल.

महत्वाच्या बातम्या:
राज्यात पावसाचा धुमाकूळ! पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला, हजारो क्विंटल लाल मिरची खराब; लाखोंचे नुकसान
राज्यात सोयाबीनला कवडीमोल भाव? निसर्गाचा लहरीपणा आणि कमी भावामुळे शेतकरी हवालदिल

English Summary: PM Kisan Tractor Yojana: Golden opportunity to buy new tractor at half price
Published on: 11 October 2022, 03:22 IST