Government Schemes

PM Kisan: केंद्र सरकारने देशातील शेती क्षेत्राला चालना मिळावी यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही आहे. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे ११ हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आले आहेत. मात्र १२वा हफ्ता अजूनही आला नसल्याचे शेतकरी त्याची वाट पाहत आहेत.

Updated on 05 August, 2022 10:19 AM IST

PM Kisan: केंद्र सरकारने (Central Goverment) देशातील शेती क्षेत्राला चालना मिळावी यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही आहे. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे ११ हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आले आहेत. मात्र १२वा हफ्ता अजूनही आला नसल्याचे शेतकरी (Farmers) त्याची वाट पाहत आहेत.

मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याबाबत मोठे ट्विट (Tweet) केले आहे. शेतकर्‍यांसाठी ट्विट करत नरेंद्र मोदी म्हणाले की, 'देशाला आमच्या शेतकरी बंधू-भगिनींचा अभिमान आहे. ते जितके बलवान असतील तितका नवीन भारत समृद्ध होईल. मला आनंद आहे की पीएम किसान सन्मान निधी आणि शेतीशी संबंधित इतर योजना देशातील करोडो शेतकर्‍यांना नवीन बळ देत आहेत.

बाराव्या हप्त्याचे पैसे कधी येणार?

पीएम किसानचा पुढील हप्ता या महिन्यात मिळू शकतो. वास्तविक, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातील पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान, तर दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. त्याच वेळी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान हस्तांतरित केले जातात. त्यानुसार पीएम किसानचा 12 वा हप्ता पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो.

दिलासादायक! खाद्यतेलाच्या किमतीत होऊ शकते इतक्या रुपयांनी घट; जाणून घ्या...

अर्ज अपडेट करा

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत तुम्हाला कोणतीही समस्या येत असेल तर ती लवकर सोडवा.
यासाठी हेल्प लाइन नंबरवर कॉल करून किंवा मेल आयडीवर मेल करून तुम्ही उपाय काढू शकता.
पीएम किसानचा हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधला जाऊ शकतो.
तुम्ही तुमची तक्रार ई-मेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वर पाठवू शकता.
तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल, तर अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन नोंदणी करा.

सोन्या चांदीच्या दरात घसरण! चांदी 21923 रुपयांनी घसरली; जाणून घ्या नवीनतम दर...

अशी तपासा हप्त्याची स्थिती

1. हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी, तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.
2. आता Farmers Corner वर क्लिक करा.
3. आता लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.
4. आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
5. येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
6. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

महत्वाच्या बातम्या:
पेट्रोल डिझेलचे दर जाहीर! डिझेल 79.74 रुपये तर पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर...
IMD Alert: या राज्यांमध्ये धो धो पाऊस बरसणार! हवामान खात्याने दिला अति मुसळधार पावसाचा इशारा

English Summary: PM Kisan: Prime Minister Narendra Modi's Big Tweet
Published on: 05 August 2022, 10:19 IST