PM Kisan Yojana: PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 12 व्या हप्त्याचे पैसे अद्याप आलेले नाहीत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. सध्या 12 वा हप्ता 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू राहील. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी, 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत 8 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा 12 वा हप्ता वर्ग केला आहे. सर्व लोकांच्या खात्यात पैसे आले आहेत, मात्र दोन आठवडे उलटून गेले तरी अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत.
EPFO पेन्शनधारक सावध! निवृत्तीनंतरचे पैसे काढण्यावर आला हा नवा नियम
अशा स्थितीत त्यांच्या खात्यात हप्ता का आला नाही, अशी चिंता त्या शेतकऱ्यांना सतावत आहे. तुमची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही अधिकृत ईमेल आयडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधू शकता. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर देखील संपर्क साधू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर पुढील हप्त्यात तुमच्या खात्यात 12 व्या हप्त्याची रक्कम जोडली जाऊ शकते.
केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6,000 रुपये पाठवते. ही रक्कम दर 4 महिन्यांनी 2000-2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये पाठविली जाते. जर तुम्ही PM किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यावर मदत पोहोचली नसेल, तर याची काही कारणे असू शकतात.
तुम्ही तुमची हप्त्याची स्थिती स्वतः देखील तपासू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान www.pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. इथे गेल्यावर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल. त्यावर क्लिक करा आणि Beneficial Status हा पर्याय निवडा. त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि Get Data वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती कळेल. जर पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही टोल फ्री हेल्पलाइनचीही मदत घेऊ शकता.
मंत्रालयाशी संपर्क कसा साधायचा
पीएम किसान टोल फ्री क्रमांक- 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक- 155261
पीएम किसान लँडलाइन नंबर- ०११-२३३८१०९२, २३३८२४०१
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन- ०११-२४३००६०६
पीएम किसान दुसरी हेल्पलाइन- ०१२०-६०२५१०९
ई-मेल आयडी- pmkisan-ict@gov.in
7th pay commission: कर्मचाऱ्यांचा मूळ वेतनात होणार मोठी वाढ
पीएम किसान निधीच्या पैशासाठी eKYC आवश्यक
पीएम किसान पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता मिळविण्यासाठी त्यांना eKYC करणे अनिवार्य असल्याचे सर्व शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर ही रक्कम तुमच्या खात्यात येणार नाही. म्हणून ते तपासा आणि जर ई-केवायसी पूर्ण झाले नसेल तर ते त्वरित पूर्ण करा. त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येतील.
eKYC करूनही पैसे आले नाहीत, मग करा हे काम
तुम्ही पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत तुमची स्थिती आणि लाभार्थी यादी देखील तपासली पाहिजे. लाभार्थी यादी तपासल्यानंतर तुमचे नाव दिसत नसेल, तर तुमच्या अर्जात त्रुटी असण्याची शक्यता आहे. हे दुरुस्त करण्यासाठी, तुम्ही पोर्टलवर आणि जवळच्या कृषी सहाय्य केंद्रावर ऑफलाइन जाऊन सुधारणा करू शकता.
PM किसान सन्मान निधी योजनेची स्थिती याप्रमाणे तपासा
१. सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
२. यामध्ये होम पेजवर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर हा पर्याय निवडावा लागेल.
३. यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल.
४. ड्रॉप डाउन वर क्लिक करा.
५. आता त्यात राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
६. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल.
७. जर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल तर अर्जात काही तफावत असण्याची शक्यता आहे.
८. तुमच्या जवळच्या कृषी सहाय्य केंद्रावर जा आणि पोर्टल किंवा ऑफलाइनच्या मदतीने त्रुटी दूर करा.
Published on: 02 November 2022, 12:32 IST