Government Schemes

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी 31 मे रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा 11 वा हप्ता (Pm Kisan 11th Installment) हस्तांतरित केला आहे. तीन दिवस उलटूनही अनेक शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात पैसे आलेले नाहीत.

Updated on 02 June, 2022 7:03 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी 31 मे रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा 11 वा हप्ता (Pm Kisan 11th Installment) हस्तांतरित केला आहे. तीन दिवस उलटूनही अनेक शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात पैसे आलेले नाहीत.

यामुळे खात्यात हप्ता का आला नाही याची अनेकांना काळजी वाटत आहे. जर तुमच्याही खात्यात 2 हजार आले नसतील तर आपण पीएम किसानच्या हेल्पलाइन नंबरवर किंवा मोबाईल नंबर कॉल करू शकता.

12 कोटी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले

31 मे रोजी शिमला येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000-2000 रुपयांचा 11 वा हप्ता हस्तांतरित केला. देशातील 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 21 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले. मात्र तिसऱ्या दिवशीही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर तुम्ही पीएम किसानच्या हेल्प लाईन क्रमांकांवर (Pm Kisan Help Line Number) तक्रार करू शकता.

नोंदणीकृत शेतकरी या क्रमांकावर तक्रार करू शकतात

अनेकांची नावे आधीच्या यादीत होती, मात्र नवीन यादीत नाहीत. मागच्या वेळी पैसे आले पण यावेळी आले नाहीत, तर तुम्ही पीएम किसान सन्मानच्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करू शकता.

याप्रमाणे मंत्रालयाशी संपर्क साधा

पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266

पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261

पीएम किसान लँडलाइन क्रमांक : 011-23381092, 23382401

पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606

पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109

ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in

या योजनेचे फायदे

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. जर अद्याप तुमच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले गेले नाहीत, तर सर्वप्रथम तुमची स्थिती आणि बँक खाते तपासणे महत्वाचे राहणार आहे.

English Summary: PM Kisan: Didn't PM Kisan get Rs 2,000? Then call this number
Published on: 02 June 2022, 07:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)