Government Schemes

भारत एक कृषिप्रधान देश आहे मात्र असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून देशातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत.

Updated on 29 April, 2022 10:17 PM IST

भारत एक कृषिप्रधान देश आहे मात्र असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून देशातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत.

2014 साली सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित केल्या. यापैकीच एक आहे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात.

आतापर्यंत या योजनेंतर्गत या योजनेच्या तमाम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 1.82 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 10 हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहेत. आणि आता 11व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेअंतर्गत, सरकार ही रक्कम शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये देते.  शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2 हजाराची आर्थिक मदत दिली जाते.

हेही वाचा :

मोठी बातमी! या पद्धतीने e-KYC केली नाही तर PM Kisan चा 11 वा हफ्ता बँकेत जमा होणार नाही

*मोठी बातमी! सोने तारण ठेऊन SBI देणार शेतकऱ्यांना 'एवढे' लोन

ई-केवायसी आता बंधनकारक 

पीएम किसान सन्मान निधी या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने आता ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी सरकारने 31 मे ही मुदतही निश्चित केली आहे. अर्थातच ज्या शेतकऱ्यांची E-KYC या दिवसापूर्वी पूर्ण होणार नाही, ते 11व्या हप्त्यापासून वंचित राहतील.

पोर्टलवर ई-केवायसीचा पर्याय पुन्हा सुरु 

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता शेतकऱ्यांना OTP द्वारे आधार आधारित ई-केवायसी पुन्हा पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे, हे फीचर काही दिवसांपूर्वी शासनाने पोर्टलवरून काढून टाकले होते. यामुळे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन वेबसाइटवर ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

ई-केवायसी ऑनलाइन कशी करणार

»यासाठी संबंधित शेतकऱ्याला सर्व प्रथम पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर भेट द्यावी लागणार आहे.

»वेबसाईटवर गेल्यानंतर 'फार्मर्स कॉर्नर' या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ई-केवायसी टॅबवर क्लिक करावे लागणार आहे.

»यानंतर एक पेज ओपन होईल, तिथे आधार क्रमांकाची माहिती देऊन, सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.

»त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.

» 'Submit OTP' वर क्लिक करून OTP टाकावा लागेल आणि सबमिट यावर क्लिक करावे लागेल.

»आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकरी ही प्रक्रिया ऑफलाइन देखील पूर्ण करू शकतात. यासाठी त्यांना जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

English Summary: Pm Kisan: Complete 'this' work on time, otherwise you will never get 2 thousand weeks
Published on: 29 April 2022, 10:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)