विमा घेणे प्रत्येकालाच परवडते असे नाही. कारण बऱ्याच विमा कंपन्यांच्या पॉलिसीचे प्रीमियम हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या असतात. परंतु यामुळे सर्वसामान्यांना देखील विमा संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत असून त्यापैकी एक केंद्र सरकारने सन 2015 यावर्षी प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना सुरू केली होती. सुरुवातीला या योजनेमध्ये भरायचा प्रीमियम हा 330 रुपये होता.
परंतु आता त्यामध्ये थोडीशी वाढ करण्यात आली असून तो 436 रुपये करण्यात आला आहे. या आवाक्यातला प्रीमियमच्या माध्यमातुन व्यक्तीचा मृत्यू झाला तर संबंधिताच्या नॉमिनीला किंवा कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात.
एवढेच नाही तर एखाद्या व्यक्तीचा आजार किंवा अपघाताने मृत्यू झाला तर ज्या व्यक्तीच्या नावावर विमा आहे त्यांच्या नॉमिनी किंवा कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतील. या योजनेचा लाभ तुम्हालाही घ्यायचा असेल तर यामध्ये वयोमर्यादा निश्चित केली असून ती कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त पन्नास वर्षे अशी आहे.
या योजनेचे एकंदरीत स्वरूप
या योजनेमध्ये तुम्हाला वर्षाला 436 रुपये जमा करावे लागतात. या विम्याची मुदत ही प्रत्येक वर्षाची एप्रिल आणि 31 मे पर्यंत असते.
एक मुदत विमा योजना असून टर्म इन्शुरन्स मध्ये पॉलिसी घेणाऱ्याच्या मृत्यूनंतर लाभ मिळतो. या योजनेसाठीचा जो काही प्रीमियम असतो तो विमाधारकाच्या बँक अकाउंट मधून एका ठराविक तारखेला डेबिट केला जातो. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
नक्की वाचा:Crop Insurance Scheme: पीक विमा योजनेसाठी महसूल विभागाचा पुढाकार; घेतला 'हा' मोठा निर्णय
एकंदरीत या योजनेचा फायदा घेण्याची पद्धत
तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे तुमच्या आधार कार्ड,ओळखपत्र तसेच बँकेचे पासबुक आणि पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच मोबाईल नंबर असणे अत्यावश्यक आहे.
या योजनेमध्ये तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात किंवा एलआयसी शाखेत जाऊन तुमचे विमा खाते उघडू शकतात.
Published on: 01 August 2022, 07:25 IST