Pm Awas Yojana 2022: प्रत्येकाला राहण्यासाठी घर असावे, या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) सुरू केली होती. आतापर्यंत लाखो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
तुम्हीही प्रधानमंत्री आवास योजनेचा (Pm Awas Yojana) लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल, तर आजची बातमी तुमच्या उपयोगाची आहे. होय, कारण आज आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
ही पद्धत जाणून घेतल्यावर तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज भासणार नाही, तर जाणून घेऊया कोणता आहे हा मार्ग.
पीएम आवास योजना शहरी यादी कशी तपासायची
पंतप्रधान आवास योजनेच्या वेबसाइटला भेट द्या (https://pmaymis.gov.in/).
होम पेजवर Search Benificiary यावर क्लिक करा आणि मग Search By Name वर क्लिक करा.
यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल
येथे तुम्ही तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
त्यानंतर Show बटणावर क्लिक करा.
त्यानंतर लाभार्थ्यांची यादी उघडेल.
जर अर्ज स्वीकारला गेला तर तुम्हाला तुमचे नाव येथे दिसेल.
Pm Kisan: मोठी बातमी! पीएम किसानच्या ई-केवायसीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
पीएम आवास योजना ग्रामीण यादी कशी तपासायची
सर्वप्रथम या लिंकवर क्लिक करा (https://awaassoft.nic.in/netiay/AdvanceSearch.aspx).
येथे विनंती केलेली सर्व माहिती भरा.
राज्य, जिल्हा, ब्लॉक इत्यादी सर्व माहिती भरल्यानंतर सर्च वर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर पीएम आवास योजना ग्रामीणची यादी उघडेल.
जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल तर तुमचे नाव या यादीत असेल.
महिन्याला 5 हजार कमवायचे आहेत का मग करा 'हे' एक काम, वाचा सविस्तर
या योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रधानमंत्री योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे कच्ची घरे आहेत किंवा नाहीत त्यांना पैसे दिले जातात. आतापर्यंत देशातील लाखो लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेंतर्गत मैदानी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपये दिले जातात. त्याचबरोबर डोंगराळ भागासाठी 1 लाख 30 हजार रुपये शासनाकडून दिले जातात.
Published on: 05 June 2022, 02:40 IST