Government Schemes

सोलापूरचे माजी पालकमंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी धरणातील काही पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी- निंबोडी या नव्याने मंजूर झालेल्या योजनेसाठी नेण्याचा घाट घातला आहे. यासाठी सरकारने निधी देखील मंजूर केला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नेते आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Updated on 11 July, 2022 2:26 PM IST

सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. सोलापूरचे माजी पालकमंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी धरणातील काही पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी- निंबोडी या नव्याने मंजूर झालेल्या योजनेसाठी नेण्याचा घाट घातला आहे. यासाठी सरकारने निधी देखील मंजूर केला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नेते आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे अनेकदा आंदोलने देखील करण्यात आली आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक सिंचन योजना निधी अभावी रखडल्या असतानाही, लाकडी- निंबोडी साठी 348 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील अनेक उपसा सिंचन योजना निधी अभावी गेल्या अनेक वर्षापासून रखडल्या आहेत. असे असताना माजी मंत्री भरणे यांनी हा कारभार केला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यामुळे आता या योजनेला कायमस्वरूपी स्थगिती द्यावी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे. याबाबत लेखी निवेदन मोहोळ येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर, युवा नेते सोमेश क्षीरसागर यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता 25 वर्ष येणार नाही वीज बिल, मोदी सरकारची मोठी घोषणा..

दरम्यान, उजनी धरणावर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहती, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्याची तहान ही याच धरणाच्या पाण्यावर भागविली जाते. वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या, विविध उद्योगधंदे, यासह घटलेले पर्जन्यमान याचा ताळमेळ घातला तर हे पाणी अत्यंत तोकडे पडत आहे. सोलापूर शहराचा पाणीपुरवठाही याच धरणावर अवलंबून आहे, याचा विचार करावा, असेही यामध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ! जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा मुलाच्या पक्षाला रामराम

दरम्यान, लाकडी- निंबोडी ही योजना मंजूर झाल्यानंतर इंदापूरमध्ये शेतकऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला होता. लवकरच या योजनेला सुरुवात देखील होणार होती. मात्र आता नवीन सरकार आल्यामुळे ही योजना रखडण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
अशी शेती केली तर शेतकऱ्यांची पण लग्न होतील!! पट्ठ्याने बँक मॅनेजरच्या नोकरी सोडून केली शेती, आज लाखो कमवतात
शेतकऱ्यांनो काळजी घ्या, आता बनावट कीटकनाशके बाजारात, अशी करा खात्री...

English Summary: Permanent ban on Lakdi-Nimbodi scheme? Statement to the Chief Minister
Published on: 11 July 2022, 02:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)