राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ५० हजार देण्याची घोषणा केली होती. यामुळे हे पैसे कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता ही प्रतीक्षा संपणार आहे. नियमितपणे पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर समोर आली आहे. आता याच अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांच्या (Agriculture) याद्या ऑनलाईन जाहीर करण्यात आल्या आहेत.
2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. सीएससी (csc) पोर्टलवर या 50 हजारांसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. यामुळे यामध्ये आपले नाव आहे की नाही हे समजत आहे.
csc च्या पोर्टलवर त्याच शेतकऱ्यांना याद्या पाहता येतील ज्या शेतकऱ्यांचे csc पोर्टलवर अधिकृतता (Authorization) असेल. यासाठी तुम्हाला csc पोर्टलवर कर्ज सर्च करावं लागेल. यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची लिंक दिली जाईल. यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्ही त्या पोर्टलवर जाचाला. यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया करावी लागेल.
लसीकरणानंतरही जनावरांना लम्पीची लागण, शेतकऱ्यांची चिंता वाढली..
याठिकाणी तुम्हाला लिस्ट हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. यानंतर तुम्हाला तेथे जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल. त्यांनतर तालुका निवडल्यानंतर तुम्हाला गावांची नावे दिसतील. तुम्ही ज्या गावातील असाल त्या गावाची लाभार्थी यादी तुम्ही पाहू शकता. यानंतर तुम्हाला केवायसी साठी सूचना करण्यात येतील. अशाप्रकारे तुम्ही यादी चेक करू शकता.
सरकार देशातील सर्व पंचायतींमध्ये सहकारी डेअरी उघडणार, अमित शहा यांची माहिती
तसेच जर यावर तुमची माहिती चुकीची असल्यास बँकेत आक्षेप नोंदवावा. यामुळे हा देखील पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे. जर तुम्ही यादी चेक केली नसेल तर लगेच करून आपले नाव यादीत आहे की नाही याची खात्री करा.
महत्वाच्या बातम्या;
गहू उत्पादक राज्यात गव्हाचा तुटवडा, किंमतीत 5 टक्क्यांची वाढ..
यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटणार? ३५ साखर कारखान्यांनी घेतली ऊस गाळप सुरू करण्याची परवानगी
बारामतीत मुसळधार पावसाचे थैमान, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Published on: 14 October 2022, 10:05 IST