Government Schemes

केंद्रातील मोदी सरकर अनेक योजना लागू करत आहेत. तसेच अनेक योजनांमध्ये बदल देखील करत आहे. सर्वसामान्य लोकांना याचा फायदा व्हावा, हा यामागचा हेतू आहे. आता तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल (Ration Card) आणि सरकारच्या स्वस्त धान्याच्या दुकानांमधून तुम्हीही रेशन खरेदी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. यामुळे तुमचा फायदा होणार आहे. मोदी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Updated on 22 June, 2022 10:53 AM IST

केंद्रातील मोदी सरकर अनेक योजना लागू करत आहेत. तसेच अनेक योजनांमध्ये बदल देखील करत आहे. सर्वसामान्य लोकांना याचा फायदा व्हावा, हा यामागचा हेतू आहे. आता तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल (Ration Card) आणि सरकारच्या स्वस्त धान्याच्या दुकानांमधून तुम्हीही रेशन खरेदी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. यामुळे तुमचा फायदा होणार आहे. मोदी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

आता नव्या अपडेट अंतर्गत आसाममध्येही आता रेशन कार्ड 'पोर्टेबिलिटी' सर्व‍िस (Ration Card Portability) सुरु करण्यात आली आहे. आता 'एक देश, एक रेशन कार्ड' (One Nation, One Ration Card) ही केंद्राची योजना इथंही लागू करण्यात आली आहे. यामुळे आता कोणत्याही रेशनच्या दुकानातून सामान घेता येणार आहे. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम, 2013 (NFSA) अन्वये लाभ घेऊ शकणाऱ्या लाभार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार कोणत्याही इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल डिवाईस (E-POS) असणाऱ्या रेशनच्या दुकानतून अनुदान असणाऱ्या धान्याची खरेदी करता येणार आहे.

या योजनेच्या वापरासाठी लाभार्थ्यांनी बायोमेट्रीक प्रमाणीकरण असणे आवश्यक असेल. केंद्राची ही योजना लागू करणारं आसाम हे 36 वं राज्य/ केंद्रशासित प्रदेश आहे. सध्या संपूर्ण देशभरात अन्नसुरक्षा 'पोर्टेबल' करण्यात आली आहे. यामुळे आता हळूहळू सगळीकडे याची व्याप्ती वाढणार आहे. अन्नपुरवठा मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

'ज्यांना सहकारी कारखाना काढता आला नाही त्यांनी खाजगी कारखाने काढले, त्यातील मी पण एक होतो'

गेल्या अनेक दिवसांपासून याचा अभ्यास केला गेला होता, यामुळे आता ही योजना लागू करण्यात आली आहे. कोरोना काळात सरकाने अनेकदा मोफत राशन दिले होते, याचा अनेक सर्वसामान्य नागरिकांना फायदा झाला होता.

महत्वाच्या बातम्या;
कारल्यातून लाखोंची कमाई! उत्पादनाबरोबरच वाढीव दराने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस
मुलींना सरकार देणार ५१ हजार रुपये, करा फक्त 'हे' काम
टोमॅटोने दुष्काळच हटवला! वर्षात दुहेरी उत्पादनातून शेतकऱ्याने कमवले २ कोटी ५० लाख

English Summary: 'One Country One Ration Card', new scheme implemented across country benefit
Published on: 22 June 2022, 10:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)