सरकार नागरिकांचे आयुष्य अधिक सुरळीत करण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहेत. सरकारने आता अन्न वितरण व्यवस्थेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एटीएममधून तुम्ही नोटा काढता. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल अशाच प्रकारची रेशनची प्रक्रिया सुरु होणार आहे. गरजेनुसार एटीएममधून रेशन वाटप करण्याची योजना राबवण्यात येणार आहे. यासंबधीतील काम सुरु झाले आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी कमी होतील. ही योजना उत्तराखंडमध्ये सुरु होणार आहे.
सध्या या योजनेचे काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे उत्तराखंडमधील सर्वसामान्य जनता आता सहजपणे एटीएम ची खरेदी करू शकते. राज्याच्या अन्न मंत्री रेखा आर्य यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे. जागतिक अन्न योजनेअंतर्गत राज्यात अन्नधान्य एटीएम सुरू होणार असून या योजनेला मंजुरीदेखील मिळाली आहे. सध्या या योजनेची सुरुवात फक्त ओरिसा व हरियाणा राज्यात सुरु आहे. आणि आता ओरिसा आणि हरियाणा नंतर उत्तराखंड हे देशातील तिसरे राज्य ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही यंत्रणा एटीएम मशीनप्रमाणे काम करणार आहे.
केळी उत्पादकांना दिलासा! उत्पादनात घट झाल्याने केळीच्या दरात मोठी वाढ
शिवाय या यंत्रणेला एटीएम मशीनप्रमाणे स्क्रीनही असणार आहे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे असेच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. अन्नधान्य एटीएम मशीनद्वारे गहू, तांदूळ, व डाळी काढता येणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने कोरोना काळात मोफत रेशन दिले होते. यामुळे याचा लाखो लोकांना दिलासा मिळाला होता. आता यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तसेच गव्हाचा कोटा आणि तांदळाचा कोटा हा राज्यांच्या स्थितीनुसार बदलण्यात आला आहे. अनेक ठिकाणी यामध्ये काळा बाजार केला जात आहे. यामुळे मोदी सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनी केली एकी आणि त्यांचे दिवसच बदलेले; कांद्याच्या भावात अशी काही वाढ झाली की...
बातमी कामाची: राज्य सरकारने घेतला कृषीबाबत मोठा निर्णय; आता कृषी मालाला मिळेल योग्य भाव
Published on: 10 June 2022, 05:45 IST