कोरोना काळात कित्येकांचे रोजगार गेले. तर काहींना कमी पगारात काम करणं भाग पडलं. यातूनच सर्वसामान्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होऊन त्यांचे खच्चीकरण होऊ लागले होते. यामध्ये छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत (PM Swanidhi Yojana) व्यवसायिक दुकानदारांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
10 हजारांचे खेळते भांडवल म्हणून निधी या व्यावसायिकांना देण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात 2020 साली करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुरळीत व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील असते . वेगवेगळ्या योजना राबवून त्यामार्फत नागरिकांना आर्थिक सहाय्य केले जाते. त्यातीलच ही एक योजना. आता जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
जाणून घेऊया पीएम स्वनिधी योजना
10 हजार रुपयांचे भांडवल करणाऱ्या व्यवसायिक दुकानदारांना या योजनेचा लाभ मिळत होता. या व्यवसायिक दुकानदारांना 20 हजार रुपये देण्यात आले होते. आता मात्र सरकार या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवल देत आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे. अर्ज केल्यास तुम्हाला 10 हजार रुपयापर्यंत खेळते भांडवल कर्ज म्हणून देण्यात येईल. हे कर्ज घेतल्यानंतर कर्जाची वेळेत परतफेड केल्यास तुम्हाला दुसऱ्या टर्ममध्ये 20 हजारांचे आणि तिसऱ्या टर्ममध्ये 50 हजारांचे कर्ज मिळेल.
योजनेतील टप्पे
या योजनेच्या पहिल्या टर्मसाठी 42 लाख 11 हजार 981 लाभार्थ्यांनी कर्जासाठी अर्ज केले होते. त्यातील जवळपास 30 लाख 722 लाभार्थ्यांना कर्ज देण्यात आले. आणि यामधील 7 लाख 36 हजार 975 लाभार्थ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली असून त्यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी मागणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 2 लाख 29 हजार 402 लाभार्थ्यांनी 20 हजारांच्या भांडवलासाठी अर्ज केले असून त्यातील 3 लाख 48 हजार 783 लाभार्थ्यांना 2019 मध्ये कर्ज देण्यात आले आहेत.
काय सांगता! जगातील सर्वात मोठ्या गवताची जगभरात चर्चा, लांबी इतकी मोठी की...
आता जून 2022 मध्ये तिसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी 20 लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आणि यामध्ये 4 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. आता या 4 लाभार्थ्यांना लवकरच कर्ज वितरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने ही योजना डिसेंबर 2024 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी मंजुरी दिली आहे.
कोणते व्यवसायिक ठरू शकतात लाभार्थी
फळविक्रेते, वडापावची गाडी, छोटे कपड्याचे दुकान, भाजोविक्रेते अशा प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय असलेल्या दुकानदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या व्यवसायिक नागरिकांनाच या योजनेअंतर्गत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा अर्ज ऑनलाईन भरू शकता किंवा मग सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन या योजनेचा लाभार्थी बनण्यासाठी अर्ज भरावा.
महत्वाच्या बातम्या:
ठरलं तर! पीक विम्यासाठी सरकार देतयं 80 कोटी 36 लाखांचा निधी; 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ
शेतकऱ्यांनो 'ही' जात लय भारी!! गाई देते सर्वात जास्त दूध, वाचा सविस्तर..
Published on: 11 June 2022, 12:13 IST