उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येथील शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी एकरी एक लाखाचे कर्ज उपलब्ध होणार आहे. हे कर्ज उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच उपलब्ध होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी कर्ज मिळाले यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व बँका शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये रेशीम शेतीसाठी कर्ज देणे हेतू सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, यावर्षी जिल्ह्यात दहा हजार एकर क्षेत्रावर रेशीम शेतीचे टार्गेट ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी महोदय यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील बऱ्याचशा बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी पुढे सरसावणार आहेत.
काळे मनुके आहेत खूपच फायदेशीर, उपाशी पोटी काळे मनुके खा, ह्रदयविकार टाळा
यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याबाबत एक बैठक झाली. बैठकीत रेशीम शेतीसाठी एकरी एक लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना दिले जावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर अनेक बँकांनी सहमती दर्शवली आहे.
कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पातून मोठ्या बदलांची अपेक्षा, मोदी सरकाराने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी आर्थिक मदत मिळाल्यास जिल्हा लवकरच रेशीम हब बनेल. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
महत्वाच्या बातम्या;
गाढवीनीच्या दुधातून कमवतायत बक्कळ पैसा, 1 लिटर दुधाची 5 हजारात विक्री
शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहेत! आता गाईच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
असा तसा नाय! तब्बल १२ कोटींचा रेडा हाय, रेडा पाहून शेतकरी झाले थक्क
Published on: 31 January 2023, 05:08 IST