Government Schemes

महावितरणने नुकसान भरून काढण्यासाठी वीज वाहणीबाबद मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी महावितरणने एक मोहीम हाती घेतली आहे. सध्या 50 टक्यांपेक्षा अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यात येणार आहे.

Updated on 30 August, 2022 11:09 AM IST

महावितरणने (MSEB) नुकसान भरून काढण्यासाठी वीज वाहणीबाबद मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी महावितरणने एक मोहीम हाती घेतली आहे. सध्या 50 टक्यांपेक्षा अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यात येणार आहे.

महावितरणच्या 16 परिमंडलातील 230 पेक्षा जास्त वाहिन्यांवर राबविण्यात येणार्‍या या मोहिमेत वीज चोरांविरुद्ध धडक कार्यवाही, नादुरुस्त मीटर बदलणे, एरियल केबल्स टाकणे (Laying aerial cables), मल्टी मीटर बॉक्स बसविणे (Multi meter box), कॅपॅसिटर बसविणे आणि वीजभाराचा समतोल राखणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.

सरल पेन्शन योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; दरमहा 15 हजार रुपयांपर्यंत मिळते पेन्शन

महावितरणद्वारे राबविण्यात येत असलेल्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेचे मुख्य उद्दीष्ट हे वीजहानी कमी करण्याचे असून त्या अनुषंगाने महावितरणने धडक मोहीम राबविण्याचे ठरवले आहे.

या गोष्टींमुळे होते नुकसान

वीजहानीची (power outage) कारणे व त्यानुसार उपाययोजना राबिवण्यासाठी वीज वाहिन्यांचे मीटरिंग सुस्थितीत आणणे, स्वयंचलित पद्धतीने घेण्यात आलेले रीडिंग अपलोड करणे, ग्राहकाला ज्या वितरण रोहित्रावरून वीजपुरवठा (power supply) करण्यात येतो तेच रोहित्र बिल प्रणालीमध्ये आहे किंवा नाही याची खातरजमा करणे, विजेची चोरी, अयोग्य मिटरिंग, अनधिकृत वीजपुरवठा (power supply) किंवा वीज वाहिन्यावर असलेले आकडे, मीटर रीडिंगमधील त्रुटी, वीजबिलांमधील समस्या ही कारणे नुकसान वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

Cauliflower consumption: सावधान! प्रमाणापेक्षा जास्त फुलकोबीचे सेवन केल्याने होतात गंभीर समस्या

त्यामुळे वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. नादुरुस्त मीटर तातडीने बदलण्यात येतील. तसेच मीटर रीडिंग (Meter reading) योग्य राहील याची काळजी घेतली जाईल व वीजखांबावर मीटर बॉक्स बसविण्याचे काम करण्यात येईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 
या शुभ मुहूर्तावर करा लाडक्या बाप्पाची स्थापना; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी
आजपासून ते ३ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे राशीभविष्य; वाचा सविस्तर
शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय; पीक विम्यासाठी 187 कोटी मंजूर

English Summary: Now Mahavitran campaign implemented to recover
Published on: 30 August 2022, 10:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)