ठिबक सिंचन आता काळाची गरज बनली आहे. ठिबक सिंचनाच्या वापराने पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात करता येते व पिकाच्या उत्पादन वाढीत देखील ठिबक चा मोठा हातभार लागतो.
राज्यामध्ये अजूनही बऱ्याच भागात किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनीठिबक सिंचनाची सोय शेतांमध्ये केलेली नाही. शेतकरी पाट पद्धतीनेच पाणी शेतीला देतात.त्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठिबक सिंचनाच्या वापरास प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनाने पूर्वी 55 टक्के अनुदान व दोन हेक्टर च्या वरील शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देऊ केले होते परंतु या निर्णयात आता बदल करून 80 टक्के अनुदान ठिबक सिंचनाला देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या संबंधीची ठिबक व सूक्ष्म सिंचन योजने मध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जात होते.
या बाबतीत अशोक चव्हाण यांनी म्हटले की या बाबतीत मी कृषिमंत्र्यांना भेटून सविस्तर चर्चा केली. शासनाने आता यामध्ये भरीव वाढ केली असून सर्व शेतकऱ्यांना यासाठी आता 80 टक्के अनुदान दिले जाणार आहे. आपल्याकडे जे पाणी उपलब्ध आहेत त्या पाण्याचा व्यवस्थित आणि काटेकोर वापर होण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचन तंत्र हे खूप मोलाचे आहे. आता संपूर्ण जगाने हे या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कमी पाण्यात अधिकची प्रगतीसाध्य करून दाखवली आहे.महाराष्ट्र मध्ये देखील शेतकऱ्यांमध्ये ठिबक बाबत जनजागृती चांगली झाली असून अधिकाधिक शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्यात ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी देऊन दर्जेदार कृषी उत्पादन घेता येणे शक्य झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:अतिरिक्त उसासाठी आता मुख्यमंत्री रिंगणात, घेतला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा
Published on: 17 May 2022, 07:13 IST