केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. खासकरून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा विचार केला तर बऱ्याच प्रकारच्या योजना या शेतकऱ्यांसाठी आहेत. मग त्या सिंचन क्षेत्राशी संबंधीत असो की पशुपालनाशी संबंधित अशा बऱ्याच योजना आहेत.
त्यातल्या त्यात केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही सगळ्यात महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात देण्यात येतात.
नक्की वाचा:Important: सेंद्रिय शेती करायची असेल तर 'या'योजनेतून येणार 50 हजाराची मदत, वाचा सविस्तर
याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील शिंदे सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू करण्यात येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत. जर आपण एकंदरीत विचार केला तर पीएम किसान योजनेचे 6000 हजार वार्षिक आणि राज्य सरकारचे सहा हजार रुपये असे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळू शकणार आहेत.
या योजनेसंबंधी माहिती
या योजनेसाठी जी काही आर्थिक तरतूद लागेल ती येणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात करण्यात येणार असून या माध्यमातून राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा हा निर्णय खूप फायद्याचा ठरणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळविण्यासाठी काय अटी असणार आहे अजून स्पष्ट झाले नसून तीन दिवसापूर्वी झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.
जर आपण सध्या राज्यातील येऊ घातलेला निवडणुकांचा विचार केला तर मुख्यमंत्री किसान सन्मान योजना लवकर लागू होण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांनी देखील या योजनेला तत्त्वतः मान्यता दिली आहे.या योजनेसाठीचे आवश्यक काम विभागीय पातळीवर सुरू देखील झालेले आहे.
Published on: 10 September 2022, 04:31 IST