Government Schemes

रासायनिक खतांच्या भरमसाठ वापरामुळे त्यासोबतच किडींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक कीटकनाशकांचा वापर यामुळे जमिनीची प्रत अगदी खालावत चाललेली आहे. एवढेच नाही तर कीटकनाशकांचा अतिरिक्त वापरामुळे शेतीतून निर्माण होणारे अन्नपदार्थ देखील आरोग्याला घातक ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर मागील काही वर्षांपासून सेंद्रिय शेती ही संकल्पना जोर धरू लागली आहे.

Updated on 10 September, 2022 12:58 PM IST

रासायनिक खतांच्या भरमसाठ वापरामुळे त्यासोबतच किडींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक कीटकनाशकांचा वापर यामुळे जमिनीची प्रत अगदी खालावत चाललेली आहे. एवढेच नाही तर कीटकनाशकांचा अतिरिक्त वापरामुळे शेतीतून निर्माण होणारे अन्नपदार्थ देखील आरोग्याला घातक ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर मागील काही वर्षांपासून सेंद्रिय शेती ही संकल्पना जोर धरू लागली आहे.

सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादनाचा विचार केला तर ते कमी मिळते परंतु निसर्ग काळाचा विचार केला तर माती व पाणी तसेच पर्यावरणाला याचा खूप मोठा फायदा होतो.

नक्की वाचा:Soil Management: शेतात गाळ टाकतांना कोणती काळजी घ्यावी? कोणता गाळ टाकू नये? फायदे, वाचा सविस्तर

सेंद्रिय शेती ही येणार्‍या भविष्यकाळात शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची ठरेल. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळावे

म्हणून केंद्र सरकार देखील वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखत असून यातीलच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारी महत्वाची योजना केंद्र सरकारने कार्यान्वित केली असून या योजनेचे नाव आहे पारंपारिक कृषी विकास योजना होय.

 पारंपारिक कृषी विकास योजना नेमकी काय आहे?

 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी तीन वर्षाच्या कालावधीत 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. शेतकरी बांधवांना हे अनुदान दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येते. यातील पहिला टप्पा हा 31 हजार रुपयांचा असून तो शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा केला जातो.

नक्की वाचा:हुमणी अळ्यांपासून नुकसानाचे बंदोबस्त कसे कराल? जाणून घ्या रासायनिक जैविक पद्धती सविस्तर

या पहिल्या हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी लागणारी खते, विविध प्रकारचे जैविक खते तसेच शेतीचे तयारी, आवश्यक सेंद्रिय कीटकनाशके आणि सुधारित वाण यासाठी वापर करता येऊ शकतो. यातील उरलेला दुसरा हप्ता हा दोन वर्षात दिला जातो. या दुसऱ्या हपत्याच्या माध्यमातून उत्पादनाची पॅकिंग, प्रक्रिया तसेच विपणनाची कामे शेतकरी बांधव करू शकतात.

 या योजनेचे इतर फायदे

1- या योजनेच्या माध्यमातून 20 एकर ते पन्नास हजार पर्यंतच्या जमिनीवर सेंद्रिय शेती करण्यासाठी निवडलेल्या शेतकऱ्यांच्या क्लस्टरला 10 लाखांपर्यंतच्या अनुदान दिले जाते.

18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकता.

 लागणारी कागदपत्रे

 परंपरागत कृषी विकास योजनेच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड,पत्त्याचा पुरावा तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र,वयाचे प्रमाणपत्र,रेशन कार्ड तसेच आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर व पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असतो.

नक्की वाचा:Health Tips: 'या' घरगुती उपायांनी सर्दी-खोकला जाईल झटपट मिळेल आराम, वाचा सविस्तर

English Summary: now get 50 thousand rupees subsidy to farmer for prompt to organic farming
Published on: 10 September 2022, 12:58 IST