आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये व्यवसाय करायची इच्छा असते. परंतु यामध्ये सगळ्यात पुढे प्रकर्षाने बाब येते ती म्हणजे लागणारे भांडवल होय. तुमच्या डोक्यामध्ये कितीही प्रकारच्या व्यवसायाच्या कल्पना आले आणि तुमच्याकडे भांडवल नसले तरी त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही. अशा व्यक्तींसाठी शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना आहेत. गरज आहे फक्त या योजनेची पुरेशी माहिती असण्याची आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याची.
अशीच एक महत्त्वपूर्ण योजना असून या माध्यमातून तरुणांना दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज व्यवसाय उभारण्यासाठी देण्यात येते. ते कसे? आणि त्यासाठीच्या अटी इत्यादी बद्दल सविस्तर माहिती या लेखात घेऊ.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे कर्ज योजना
समाजातील नवतरुणांनी व्यवसाय क्षेत्रात यावे व त्यांना व्यवसाय उभारणीसाठी अर्थसहाय्य मिळावे यासाठी यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची योजना आहे.
ज्या तरुणांना व्यवसाय उभारण्याची इच्छा असेल असे तरुण या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेऊ शकतात. खास करून या कर्ज योजनेमुळे मराठी तरुणांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
कसे आहे या योजनेचे स्वरूप?
या योजनेचा लाभ प्रामुख्याने मराठा समाजातील तरुणांना दिला जातो. या माध्यमातून व्यवसाय उभारणी करता दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे रक्कम तरुणांना व्यवसायासाठी कर्जापोटी दिली जाते. ही संपूर्ण बिनव्याजी कर्ज योजना आहे.यामध्ये सर्वप्रथम दहा हजार रुपये कर्ज देण्यात येते व या घेतलेल्या दहा हजार रुपये रकमेचा कशा पद्धतीने वापर केला? हे तपासले जाते.
तसेच त्या घेतलेल्या दहा हजार रुपये रकमेची परतफेड नियमित केली असेल तर पुढच्या टप्प्यामध्ये त्याला पन्नास हजार पर्यंतचे रक्कम कर्जाच्या माध्यमातून दिली जाते. या घेतलेल्या 50 हजार रुपये कर्जाची देखील नियमितपणे परतफेड केली तर त्या पुढच्या टप्प्यात एक लाख रुपये खर्चाची रक्कम ही कर्जापोटी मिळू शकते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून दिला जाणाऱ्या दहा हजार रुपयांचे कर्ज परतफेडीसाठी तुम्हाला प्रत्येक दिवसाला दहा रुपये याप्रमाणे परतफेड करावी लागते. जेव्हा तुम्हाला पन्नास हजार रुपये इतके कर्ज मिळेल तेव्हा त्याचे परतफेड तुम्हाला प्रतिदिवशी पन्नास रुपये याप्रमाणे करावे लागते.
जेव्हा कर्जाचे मर्यादा 50 हजार रुपयांवरून तीन लाख रुपयांपर्यंत होईल तेव्हा कर्जाची परतफेड करण्यासाठी तरुणांना प्रत्येक दिवसाला शंभर रुपये याप्रमाणे परतफेड करावी लागते.
या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला या कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला तसेच जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.
नक्की वाचा:तुती लागवडीतून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; रोपवाटीकेचे करा असे नियोजन
Published on: 29 October 2022, 05:01 IST