सरकारच्या अनेक प्रकारच्या योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळतो. त्यासोबतच अनेक प्रकारच्या पेन्शन योजना देखील सरकारकडून चालू करण्यात आलेले आहेत. जेणेकरून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर एक सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देणे हा यामागचा प्रमुख हेतू आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अशीच एक महत्त्वाची योजना 2004 मध्ये सुरू करण्यात आली होती व नंतर तिचा 2009 मध्ये सर्व विभागांमध्ये विस्तार करण्यात आला. या योजनेचे नाव आहे एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टम हे होय. या योजनेविषयी या लेखात माहिती घेऊ.
सरकारची नॅशनल पेन्शन सिस्टम योजना
या योजनेच्या माध्यमातून भारतातील नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर एक सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी या योजनेची सुरुवात 2004मध्ये करण्यात आली होती.
या योजनेमध्ये कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात. अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे असून त्याच्यात नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराने केवायसी नियमांचे पालन करुन या योजनेत सहभाग नोंदविता येतो.
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची नवीन घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार बक्षीस म्हणून ५० हजार
एनपीएस खात्यांचे प्रकार
या योजनेत दोन प्रकारची खाती असतात
1- टियर 1- या प्रकारच्या खात्यात जमा केलेले कोणतेही पैसे वेळेपूर्वी काढता येत नाहीत. हे खाते उघडण्यासाठी तुमच्यासाठी टिअर दोन खातेधारक असणे अनिवार्य नसून तुम्ही या योजनेतून बाहेर असाल तेव्हाच तुम्ही पैसे काढू शकता. हे खाते पाचशे रुपयांनी उघडता येते.
2- टियर 2- या प्रकारचे खाते उघडण्यासाठी तुम्ही टियर वनचे खातेधारक असणे गरजेचे आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यामध्ये पैसे जमा करू शकता किंवा काढू शकता. प्रत्येकाने हे खाते उघडणे बंधनकारक नसून हे खाते तुम्ही किमान हजार रुपये पासून सुरु करु शकतात.
नक्की वाचा:मोठी बातमी! मोदी सरकार मुलींना देणार 15 लाख, फक्त रोज 1 रुपया जमा करा
अशा पद्धतीने मिळेल दरमहा दीड लाख रुपये पेन्शन
जर या योजनेत गुंतवणूकदाराचे वय सरासरी वीस वर्ष असेल आणि त्याने 65 वर्षे वयापर्यंत महिन्याला सहा हजार रुपये गुंतवणूक केली, तर तो एकूण 37.8 लाखांची गुंतवणूक करणार आहे.
यामध्ये तुम्हाला वार्षिक दहा टक्के परतावा मिळाल्यास एकूण गुंतवणूक 7.39 कोटी रुपये होईल. आत्ता जर एनपीएस ग्राहकांने चाळीस टक्के रक्कम ॲन्यूईटी मध्ये रुपांतरीत केली तर त्याचे मूल्य 2.95 कोटी रुपये होते.
वार्षिक दहा टक्के दराने मासिक पेन्शन एक लाख 47 हजार रुपये असेल. एमपीएस ग्राहकांना एकावेळी 4.44 कोटी रुपये मिळतील. तसेच आयकर कलम 80CCD(1),80CCD(1B) आणि 80CCD(2)
अंतर्गत एनपीएस वर कर सूट उपलब्ध असून कलम 80c व्यतिरिक्त म्हणजे एनपीएस वर दीड लाख रुपये तुम्ही आणखी 50 हजार रुपयांची वजावट घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करून दोन लाख रुपयांचा सुटचा लाभ देखील मिळवू शकतात.
Published on: 18 July 2022, 12:45 IST