केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध प्रकारच्या योजना आहेत.प्रत्येक योजनांचे स्वरूप हे वेगवेगळे असून त्यामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण देखील वेगवेगळे आहे. जर आपण गुंतवणुकीचा विचार केला तर प्रत्येक गुंतवणूकदार हा एक विचार करतो की गुंतवणूक सुरक्षित राहावी व त्यापासून मिळणारा परतावा किंवा फायदे उत्तम पद्धतीचे असावेत. या विविध प्रकारच्या गुंतवणूक योजनांमध्ये काही पेन्शन योजना देखील आहेत. अशाच एका महत्त्वपूर्ण पेन्शन योजनेची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
नक्की वाचा:Post Office Scheme: गुंतवणूक करा रुपयात आणि काही वर्षात परतावा मिळवा लाखात, वाचा माहिती
काय आहे नेमकी नॅशनल पेन्शन सिस्टम योजना?
ही एक गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची योजना असून यामध्ये प्रतिमाह तुम्हाला एकवीस हजार रुपये पेन्शन मिळणे शक्य आहे. हि एक सरकारी पेन्शन योजना असून या माध्यमातून इक्विटी आणि डेफ्ट इन्स्ट्रुमेंट या दोघांचा समावेश असून या योजनेला सरकारकडून हमी मिळते.
तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर अधिक पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी या योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये तुम्ही विसाव्या वर्षापासून गुंतवणूक करू शकतात.
जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षापासून दरमाह हजार रुपये या योजनेत जमा केले तर तुमच्या निवृत्तीच्या वयापर्यंत तुमचे यामधील योगदान पाच लाख चार हजार रुपये होईल. तसेच यामध्ये तुम्हाला वार्षिक दहा टक्के परतावा देखील मिळतो व तुमची गुंतवणूक 1.05 कोटी होते.
प्रत्येक महिन्याला मिळू शकते एकवीस हजार रुपये पेन्शन
जर नॅशनल पेन्शन सिस्टम ग्राहकाने 40% कॉर्पसचे वार्षिकी मध्ये रुपांतर केले तर त्याचे मूल्य 42.28 लाख रुपये होते व त्याच वेळी तुमची मासिक पेन्शन दहा टक्के वार्षिक दराने एकवीस हजार 140 रुपये असू शकते. या योजनेमध्ये तुम्ही तीन पर्यायांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता.
ते पर्याय म्हणजे कार्पोरेट कर्ज, इक्विटी आणि सरकारी रोखे हे होय. या तिघांपैकी तुम्हाला कोणत्या पर्यायात पैसे गुंतवायचे आहेत ते तुम्हाला निवडायचे आहे व यासाठी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे खूप महत्त्वाचे आहे.
एवढेच नाही तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वार्षिक दोन लाख रुपयांपर्यंत कर सवलत देखील मिळते व इतर कलम 80 सी अंतर्गत तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकतात. तसेच नॅशनल पेन्शन सिस्टम योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला पन्नास हजार रुपये अतिरिक्त कर सवलत देखील मिळते.
Published on: 18 September 2022, 01:15 IST