Pm Mudra Yojana: देशातील जनतेच्या कल्याणासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून देशातील जनतेच्या विकासासाठी माय-बाप शासनाकडून प्रयत्न केले जातात. अशीच एक कल्याणकारी योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना.
या योजनेच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले जातं आहे. तरुणांनी उद्योग धंदे करावे व आपली आर्थिक उन्नती करावी या हेतूने केंद्र सरकार प्रधानमंत्री मुद्रा योजना राबवत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत ग्रामीण भागात बिगर कॉर्पोरेट लघुउद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्यांचा विस्तार करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे.
या मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून 10 लाखांपर्यंतची कर्जे सहज आणि परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या योजनेचे कर्ज जर तुम्ही वेळेवर परतफेड केले तर माय-बाप शासनाकडून कर्जाचा व्याजदरही माफ केला जातो.
कर्जाचे आहेत तीन प्रकार
मित्रांनो आम्ही सांगू इच्छितो की, केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून मिळालेली कर्जे तीन श्रेणींमध्ये विभागली गेली आहेत. ते तीन प्रकार आहेत शिशू कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज. खरं पाहता नावाप्रमांणेचं शिशू कर्ज हे लहान स्वरूपाचे आहे, या प्रकारात संबंधित व्यक्तींना 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. किशोर कर्ज अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तरुण कर्जाअंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते.
कर्जासाठी अर्ज करणे अधिक सोपे
पीएम मुद्रा योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून यासाठी अर्ज करणे केंद्राने अधिक सुलभ केले आहे. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे पीएम शिशू मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही गॅरेंटरची आवश्यकता नाही किंवा त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र असे असले तरी आम्ही इथे नमूद करू इच्छितो की, कर्जाचे व्याज दर बँकेनुसार बदलू शकतात. हे सर्वस्वी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकांवर अवलंबून आहे.
मात्र साधारणपणे विचार करता या योजनेंतर्गत वार्षिक 9 ते 12 टक्के व्याजदर हा आकारला जातो. मित्रांनो जर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागणार आहे. विशेष म्हणजे देशातील अनेक बँकांनी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. या योजने संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही https://www.mudra.org.in/ वर जाऊ शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता.
कोणाला दिल जात कर्ज
PM मुद्रा योजनेंतर्गत, लहान दुकानदार, फळे, अन्न प्रक्रिया युनिट यांसारख्या छोट्या उद्योगांसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीला आधार कार्ड, पॅन कार्ड, निवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात.
Published on: 15 June 2022, 07:00 IST