केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना लाभ मिळेल. आता केंद्र सरकारने आणखी एका योजनेला मंजूरी दिली आहे. जी शेतकऱ्यांसाठी (farmers) फायदेशीर ठरणार आहे.
मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी गूड न्यूज दिली आहे. नरेंद्र मोदी (modi gov) सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली असून या बैठकीत इंटरेस्ट सब्वेंशन या (interest subvention scheme) योजनेला मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारने दिली 'ही' मोठी सवलत; जाणून घ्या
अल्प मुदतीच्या कृषीकर्जासाठी अनुदान (Subsidy for Agricultural Loans) जाहीर करण्यात आलं आहे. वर्षाला 1.5 टक्के व्याजावर अनुदान दिले जाईल. यासाठी जास्तीत जास्त 3 लाखांची मर्यादा ठेवण्यात आलीये. केंद्रीय मंत्रिमंडळानं या योजनेला मंजुरी दिली असल्याची माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
Ration Card: आता 'या' योजनेअंतर्गत रेशन कार्ड सहज होणार उपलब्ध; जाणून घ्या प्रक्रिया
सबव्हेंशन स्कीम म्हणजे काय?
सहकारी संस्था आणि बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना (farmers) अल्प आणि दीर्घ मुदतीसाठी सरकारकडून कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. अनेक शेतकरी या कर्जाची वेळेवर परतफेड करतात.
तर अनेक शेतकरी काही कारणास्तव कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जे शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करतात, त्यांनाच व्याज सवलत योजनेचा (Interest Subsidy Scheme) लाभ दिला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
Crop Management: कापूस आणि सोयाबीन पिकांतील तणनियंत्रण वेळीच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सोयाबीन विकला जातोय 'या' दरात; जाणून घ्या आजचे बाजारभाव
'या' योजनेत फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करा आणि मिळवा 75 हजार रुपयांचा लाभ; जाणून घ्या
Published on: 18 August 2022, 09:30 IST