नवी मुंबई: भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. यामुळे देशातील सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी नेहमीचं प्रयत्नशील असल्याचे बघायला मिळते. विशेषता कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहे, जेणेकरून त्यांचे उत्पन्न वाढवता येईल.
दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्वाची योजना सुरु केली आहे. केंद्र सरकार आता देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मेहरबान असल्याचे बघायला मिळतं आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2,000 रुपये हस्तांतरित करणार आहे. याशिवाय, सरकार आता अनेक मोठे फायदे देशातील शेतकरी बांधवांना देत आहे. आता या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना घरबसल्या 15 लाख रुपयांपर्यंतचा लाभ सहज मिळणार आहे. मित्रांनो खरं पाहता सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेत आहे.
शेतकऱ्यांना मिळतील इतके लाख
शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारने पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
देशभरातील शेतकऱ्यांना नवीन कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणे देखील सोपे होणार आहे.
असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. यांनतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल. होम पेजवर, EPO च्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. आता नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरावी लागेल.
यानंतर, तुम्ही पासबुक किंवा रद्द केलेला चेक स्कॅन करा आणि आयडी प्रूफ अपलोड करा.
माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, लवकरच पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित लोकांच्या खात्यात 2,000 रुपयांचा 11 वा हप्ता 31मे ला खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. याचा फायदा 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे.
Published on: 28 May 2022, 02:58 IST