वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव पशू किंवा मनुष्याची जीवितहानी झाल्यास कुटुंबीयांना नुकसान भरपाई दिली जाते. मागे शासनाने (government scheme) नुकसान भरपाई जाहीर केली होती. मात्र आता रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
मनुष्याची जीवितहानी झाल्यास या अपंगत्व किंवा जखमी झाल्यास शासनाकडून संबंधित पशुपालकाला किंवा जीवितहानी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई (compensation for damages) मिळते. मात्र आता नुकसान भरपाईत नुकतीच शासनाने वाढ केली आहे. यासंबंधी नवीन माहिती पत्रकाद्वारे पशुसंवर्धन विभागामार्फ़त देण्यात आली आहे.
नव्या निर्णयानुसार मदतीची रक्कम जाणून घेऊया
1) माणसासाठी रक्कम
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास - २० लाख
व्यक्ती कायमस्वरूपी अपंग झाल्यास - ५ लाख
व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास - सव्वा लाख रुपये
मेष, सिंह, तूळ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
2) पाळीव प्राणी
१)गाय, म्हैस व बैल मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ७० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.
२) मेंढी, बकरी व इतर पशुधनांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजार यापैकी कमी असणारी रक्कम.
३) गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजार भाव किमतीच्या ५० टक्के किंवा १५ हजार देण्यात येतील.
सावधान! राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
अशी मिळणार रक्कम
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यास रुपये २० लाख पैकी २० लाख रुपये देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम दहा लाख त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम जमा करण्यात येईल.
रुपये दहा लाखांपैकी रुपये पाच लाख पाच वर्षांकरिता ठेव रकमेमध्ये तर उर्वरित रुपये पाच लाख १० वर्षांकरिता फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील.
दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल. तसेच व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी (medication) येणारा खर्च देण्यात येईल. मात्र खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक असल्यास रकमेची मर्यादा रुपये २० हजार प्रती व्यक्ती देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
'या' 4 पालेभाज्या रोजच्या आहारात खा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त
Gold price today! सोने- चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन किंमती...
सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात मोठा फटका; गव्हाच्या किंमतीत 4 टक्यांनी वाढ
Published on: 06 October 2022, 01:30 IST