Scheme For Women:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता आर्थिक लाभाच्या अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सोयी सुविधा आणि व्यवसाय उभारणी इत्यादी करिता अनुदान स्वरूपात देखील आर्थिक मदत करण्यात येते.
या अनुषंगाने जर आपण भारत सरकारचा विचार केला तर महिलांना स्वावलंबी होता यावे आणि आर्थिक दृष्ट्या त्या सक्षम व्हाव्यात याकरिता देखील अनेक योजना राबवल्या जातात. अगदी याच पद्धतीने महिलांसाठी सरकारची एक योजना खूप महत्त्वाची असून 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती.
महिला सन्मान बचत पत्र योजना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी या योजनेची घोषणा केली होती व साधारणपणे एक एप्रिल 2023 पासून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याकरिता खास करून या योजनेची आखणी करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिला एका पेक्षा जास्त खाती उघडू शकतात व त्यांना या खात्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत आहे.
या योजनेमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर यामध्ये महिला 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून साडेसात टक्के व्याज देण्यात येत असून या योजनेत 100 च्या पटीमध्ये महिलांना गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा दोन लाख रुपयांची आहे.
या ठिकाणी उघडता येईल खाते
या योजनेबद्दल माहिती देताना सोमवारी सरकारने लोकसभेमध्ये सांगितले की, या योजनेअंतर्गत आतापर्यंत 14 लाख पेक्षा जास्त खाती उघडण्यात आली असून आतापर्यंत एकूण आठ हजार सहाशे तीस कोटी रुपये जमा झालेले आहेत.
या योजनेची लोकप्रियता वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने आता पोस्ट ऑफिस आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसोबत व इतर खाजगी बँकांमार्फत ही योजना सुरू केली आहे. जर महिलांना या योजनेअंतर्गत खाते उघडायचे असेल तर महिला ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक तसेच आयडीबीआय बँक आणि आयसीआयसीआय बँकेत खाते उघडू शकतात.
या योजनेसाठी असा करा अर्ज
महिला सन्मान बचत खाते उघडायचे असेल तर याकरिता ओळखीचा पुरावा आणि पत्ता यासारखे वैयक्तिक माहिती देणे गरजेचे असते. याकरिता संबंधितांना आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पत्त्याचा पुरावा देणे गरजेचे आहे. तुम्हाला या योजनेअंतर्गत खाते उघडायचे असेल
तर अर्ज सबमिट करण्याकरिता आणि तो भरून घेण्याकरिता पोस्ट ऑफिस किंवा बँकेला भेट द्यावी. कागदपत्रे सोबत घेऊन तुम्ही या ठिकाणी भेट द्या व तुम्हाला या योजनेमध्ये किती गुंतवणूक करायची आहे ती रक्कम निश्चित करा.
Published on: 05 August 2023, 10:19 IST