गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. यातच राज्यातील सरकार आता बदलले आहे. असे असताना मात्र सरकार बदलण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये आता सरकार बदल्यापूर्वीच ( MVA ) महाविकास आघाडी सरकारने याचा आदेश जारी केला, तसेच शेततळ्यासाठी शेतकऱ्यास 75 हजारापर्यंत अनुदान मिळणार असून या रकमेच्या मदतीने (Farm Ponds) शेततळे उभारता येणार आहे.
याबाबत आता यासंर्भातील माहिती शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयातून घ्यावी लागणार आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड ही सोडतद्वारे केली जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांचे अर्ज एकत्र करुन त्याची सोडत आणि त्यानुसार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ असे त्याचे स्वरुप असणार आहे. शेततळ्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.
यंदाच्या (Budget) अर्थसंकल्पामध्ये शेततळ्यासाठी वाढीव अनुदान देण्याची घोषणा झाली होती मात्र, प्रत्यक्ष निर्णय झाला नव्हता. यामुळे शेतकरी नाराज झाले होते. यातच मागेल त्याला शेततळे ही योजना बंद झाल्यानंतर शेततळ्यासंदर्भात आता हा मोठा निर्णय झाला आहे. यामध्ये आकारानुसार शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. यामध्ये मात्र, 30 मीटर बाय 25 मीटरासाठी 75 हजार आणि 30 बाय 30 मीटरसाठीही 75 हजार रुपयेच अनुदान असणार आहे.
डेअरीला दुध घालताना ही काळजी घेत का? होईल फायदा..
यामुळे किती मोठे शेततळे करायचे हे आपल्यालाच म्हणजेच शेतकऱ्यांनाच ठरवता येणार आहे. यापुर्वी अनुदानाची रक्कम ही 50 हजार एवढी होती. शेततळ्यामुळे नगदी पिकांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे समोर आहे आहे. पाऊस कमी असलेल्या ठिकाणी शेततळे अनेकांना वरदान ठरत आहे. यामुळे शेततळ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने अनुदानात वाढ कऱण्यात आली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता रांगेत थांबण्याचे टेन्शन मिटणार!! CNG संपल्यावर एका कॉलवर मिळणार टाकी भरून
मगरीने मित्रासमोर तरुणाला गिळले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पहा फोटो
शेतकऱ्याच्या मुलाचा जगात गाजावाजा! फेसबुकवर मिळवली करोडोच्या पॅकेजची नोकरी
Published on: 02 July 2022, 10:33 IST